Jump to content

कोडागीना गौरम्मा

कोडागीना गौरम्मा
जन्म १९१२
मृत्यू १९३९ (वय २६-२७)
राष्ट्रीयत्व भारतीय
पेशा लेखिका
जोडीदार बी टी गोपाल कृष्ण


गौरम्मा(१९१२ - १९३९) या एक एक भारतीय लेखिका होत्या. त्यांना कोडगीना गौरम्मा या नावानेही ओळखले जायचे. त्यांनी कन्नडमध्ये लिखाण केले होते. त्या कोडागु येथे राहत होत्या. त्या स्त्रीवादी होत्या.[] जुलमी ब्रिटिश सरकाराविरुद्ध उभारलेल्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या त्या समर्थक होत्या.[]

जीवन

गौरम्मा यांचा जन्म १९१२ मध्ये मडिकेरी येथील एन.एस. रामय्या आणि ननजम्मा यांच्या घरात झाला होता.[] त्यांनी कोडागु येथील सोमवारपेट तालुक्यातील बीटी गोपाल कृष्णा यांच्याशी विवाह केला. तो भाग तत्कालीन ब्रिटिश भारतातील एक प्रांत कूर्ग म्हणून ओळखला जातो.[] कूर्ग येथील मोहिमेदरम्यान त्यांनी महात्मा गांधींना त्यांच्या घरी आमंत्रित केले.[] हरिजन (दलित) कल्याण निधीसाठी त्यांचे सर्व सोन्याचे दागिने दान केले.[]

वयाच्या २७व्या वर्षी, १३ एप्रिल १९३९[] रोजी त्या भोवऱ्यामध्ये बुडाल्याने मृत्यु पावल्या.

कार्य

गौरम्मा यांनी कन्नडमध्ये 'कोडागीना गौरम्मा' या टोपणनावाने लिखाण केले.[] “अपराधी यारू” (गुन्हेगार कोण), “वानिया समसे”, “आहुती” आणि “मनुविना राणी” या त्यांच्या कथा आधुनिक आणि प्रगतीशील होत्या. त्यांच्या “मनुविना राणी” या कथेमुळे त्या प्रसिद्ध झाल्या. त्यांच्या सर्वोत्कृष्ट कथांचा एक खंड, गौरम्मा काथेगालू, मडिकेरी येथून प्रकाशित करण्यात आला.[][] गौरम्माच्या कथांचा एक खंड मारेयालागडा काथेगालू म्हणून प्रकाशित झाला आणि कन्नड लेखिका वैदेही यांनी त्याला प्रस्तावना दिली.[]

संदर्भ

  1. ^ a b TNN (October 28, 2017). "Heroes of Karnataka". The Times of India. 11 July 2021 रोजी पाहिले.TNN (28 October 2017). "Heroes of Karnataka". The Times of India. Retrieved 11 July 2021.
  2. ^ a b Vēṇugōpāla Soraba, Je Hēmalata (1 September 1995). Women writers in South Indian languages. B.R. Pub. Corp. p. 9. ISBN 9788170188360. 2014-08-06 रोजी पाहिले.Vēṇugōpāla Soraba, Je Hēmalata (1 September 1995). Women writers in South Indian languages. B.R. Pub. Corp. p. 9. ISBN 9788170188360. Retrieved 6 August 2014.
  3. ^ Kallammanavar, Srikanth (5 January 2014). "The roots of Kannada in Kodagu". Deccan Herald. deccanherald.com. 2015-04-14 रोजी पाहिले.
  4. ^ a b c Rao, H.S. Raghavendra (1 March 2012). "Pioneering steps". The Hindu. 2014-08-06 रोजी पाहिले.
  5. ^ Kamath, Dr. S. U. (1993). Karnataka State gazetteer, Kodagu District. Bangalore: Director of Print, Stationery and Publications at the Government Press. p. 660. 2014-08-06 रोजी पाहिले.
  6. ^ a b Rajan, K. Sundar (8 April 2003). "Short stories (Book Review)". The Hindu. 2014-08-06 रोजी पाहिले.Rajan, K. Sundar (8 April 2003). "Short stories (Book Review)". The Hindu. Retrieved 6 August 2014.