Jump to content

कोठा (आयुर्वेद)

साधारणतः,पचनसंस्थेस कोठा म्हणून संबोधित करण्यात येते.प्रत्येक शरीराची अन्न पचविण्याची क्षमता वेगवेगळी असते.तदनुषंगाने, मलविसर्जन क्रियेस लागणारा वेळ हा ही शरीरागणिक वेगवेगळा असु शकतो.आयुर्वेद या शास्त्राने कोठ्याची वर्गवारी तीन प्रकारात केली आहे.क्रूर किंवा जड, मध्यम व सौम्य किंवा मृदु असे ते तीन प्रकार आहेत.आपण आपला आहार ठरवितांना याकडे लक्ष पुरविणे आवश्यक आहे.

क्रूर कोठा

साधारणतः, वात प्रकृती असलेल्या लोकांचा कोठा क्रूर असतो. या प्रकारचा कोठा असलेल्यास मलविसर्जनास बराच अवधी लागू शकतो.हे त्या व्यक्तिच्या आतड्यांच्या रुक्षतेमुळे होते असे समजतात.अश्या व्यक्तिंसाठी सहसा जुलाबाचे औषध हे नगण्य/अल्प परिणाम करते.


सौम्य कोठा

अश्या प्रकारच्या व्यक्तिंमध्ये, आतड्याची मळ पुढे सरकविण्याची गती ही चांगली असते.त्यामुळे,त्यांना शौचास तुलनेने कमी वेळ लागतो.थोड्याही बिघाडाने,अपथ्यकारक पदार्थाचे सेवन केल्यास जुलाब होण्याची प्रवृत्ती असते.अश्या प्रकारच्या व्यक्ति साधारणतः पित्त प्रकृतीच्या असतात.या व्यक्तिंना मलावरोधाची तक्रार असत नाही.

मध्यम कोठा

क्रूर व सौम्य कोठा यामधील स्थिती म्हणजे मध्यम कोठा होय.

आहारावर नियंत्रण

क्रूर कोठा असणाऱ्या व्यक्तिंनी,स्निग्ध पदार्थाचे जेवणासमवेत सेवन त्यांना पथ्यकारक(हितकारक) होते.रुक्षकारक पदार्थाचे सेवन हे अश्या व्यक्तिंना त्रासदायक होउ शकते.वायूकारक पदार्थ, बेकरीतील मैद्याचे पदार्थ, चिवडा,कोरडे पदार्थ त्यांनी खाणे टाळावे.तूप खाणे त्यांना हितकारक आहे.पालेभाज्यांसारखे सौम्य सारक पदार्थ खावेत.

सौम्य कोठा असलेल्यांनी दुग्धजन्य पदार्थांचे सेवन अत्यल्प प्रमाणात करावे.त्यांना रेच होउ शकतात. मध्यम कोठा असणाऱ्यांनी वरील दोघांचाही समतोल साधावा. प्रयत्नाने ते शक्य आहे.

संदर्भ

[ संदर्भ हवा ]