कोटलिंग मंदिर
कोटलिंग महाराज देवस्थान, चिखलठाण हे एक प्रसिद्ध देवस्थान आहे. जगातील शिवलिंगा पैकी १ कोटी वे शिवलिंग या ठिकाणी आहे. हे स्थान पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील टेंभूर्णी गावापासून करमाळ्याला जाणाऱ्या राज्य मार्ग क्रमांक १४१ वर थोडे आत डावीकडे आहे. हे भिमा नदीच्या तीरावर वसलेले आहे. जवळच उजनी धरण आहे.[१] तसेच रेल्वे सुविधा आहे जवळचे रेल्वे स्थानक जेऊर फक्त 12किमी अंतर दर्शन करिता जाण्यासाठी एस् टी बस चिखलठाण नं 1 व2 ,आहे.