Jump to content

कोकण कन्या एक्सप्रेस

कोकण कन्या एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक जलद प्रवासी सेवा आहे. ही गाडी मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस ते गोव्यामधील मडगांव स्थानकांदरम्यान रोज धावते. कोकण रेल्वेमार्गे धावणाऱ्या कोकण कन्या एक्सप्रेसला मुंबई ते गोवा दरम्यानचे ५८० किमी अंतर पार करायला १३ तास व २५ मिनिटे लागतात. महाराष्ट्रातील कोकण प्रदेशामधून जात असलेल्या ह्या गाडीला कोकण कन्या हे नाव दिले गेले आहे.

२५ जानेवारी १९९८ रोजी सुरू झालेली ही कोकण रेल्वेवरील सर्वात प्रथम गाड्यांपैकी एक होती. दादर मडगांव जन शताब्दी एक्सप्रेस व मांडवी एक्सप्रेस ह्या दोन गाड्या देखील मुंबई व गोव्यादरम्यान रोज धावतात.


तपशील

गाडी क्रमांक मार्ग प्रस्थान आगमन कधी सरासरी वेग अंतर
10111मुंबई छशिट – मडगांव जंक्शन23:0510:45रोज63 किमी/तास767 किमी
10112मडगांव जंक्शन – मुंबई छशिट18:0005:50रोज63 km/h
स्थानक क्रम स्थानक संकेत स्थानक/शहर अंतर
1 CSTM छत्रपती शिवाजी टर्मिनस 0
2 DR दादर8.6
3 TNA ठाणे32.9
4 PNVLपनवेल65.9
5 MNI माणगाव172.0
6 KHED खेड 240.0
7 CHI चिपळूण269.6
8 SGR संगमेश्वर रोड 312.2
9 RNरत्‍नागिरी345.0
10 VID विलावडे 392.0
11 RAJP राजापूर रोड 408.8
12 VBW वैभववाडी रोड 435.3
13 KKW कणकवली456.4
14 SNDD सिंधुदुर्ग474.1
15 KUDL कुडाळ484.7
16 SWV सावंतवाडी रोड 505.5
17 PERN पेडणे 524.0
18 THVM थिविम 534.9
19 KRMI करमळी 552.3
20 MAO मडगांव 579.6

बाह्य दुवे