Jump to content

कोंगु नाडू

कोंगु नाडू
भौगोलिक क्षेत्र
कोइंबतूर, या प्रदेशातील सर्वात मोठे महानगर.
कोइंबतूर, या प्रदेशातील सर्वात मोठे महानगर.
तामिळ नाडू मध्ये कोंगु नाडू प्रदेश
तामिळ नाडू मध्ये कोंगु नाडू प्रदेश
Countryभारत ध्वज भारत
Regionदक्षिण भारत
सरकार
 • Body तामिळनाडू सरकार
क्षेत्रफळ
 • एकूण ४५,४९३ km (१७,५६५ sq mi)
लोकसंख्या
 (2011)[]
 • एकूण २,०७,४३,८१२
 • लोकसंख्येची घनताएक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक/किमी2 (एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी round कार्यवाहक/चौ मै)
Languages
Time zone UTC+5:30 (IST)
पिन कोड
635-642xxx
Vehicle registration TN 27 to 42, TN 47, TN 52, TN 54, TN 56, TN 66, TN 77-78, TN 88, TN 86, TN 99
सगळ्यात मोठे शहरकोइंबतूर

कोंगु नाडू हा भारताच्या तामिळ नाडू राज्याचा पश्चिम भाग आहे. प्राचीन तामिळ नाडू मध्ये, या भागाच्या पूर्व सीमेवर तोंडई नाडू, आग्नेय दिशेस चोळ नाडू आणि दक्षिणेस पंड्या नडू होते. [] कोइंबतूर येथील सगळ्यात मोठे शहर आहे.

इतिहास

मध्य संगम काळात या प्रदेशात चेर साम्राज्याचे राज्य होते. दुसऱ्या शतकात उल्लेख असलेल्या कोसार समुदायाच्या, तामिळ पुराणकथांमधील सिलापतीकरम आणि संगम साहित्यातील इतर कविता कोइंबतूर प्रदेशाशी संबंधित आहेत. हे प्रदेश प्राचीन रोमन व्यापार मार्गावर आहे, जो मुझिरिस ते अरिकमेदू पर्यंत पसरलेला आहे. दहाव्या शतकात मध्ययुगीन चोळांनी हे प्रदेश जिंकले होते आणि १५व्या शतकात हे प्रांत विजयनगर साम्राज्याच्या अधिपत्याखाली आले. १७ व्या शतकात विजयनगर साम्राज्याचा नाश झाल्यानंतर, विजयनगर साम्राज्याचे सैन्य राज्यपाल मदुराई नायकांनी स्वतंत्र राज्य म्हणून त्यांचे राज्य स्थापन केले. १८ व्या शतकाच्या उत्तरार्धात, अनेक युद्धानंतर हा प्रदेश म्हैसूर नायक राजवटीखाली आला. आंग्ल-म्हैसूर युद्धात टीपू सुलतानचा पराभव झाल्यानंतर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने कोंगु नाडूला १७९९ मध्ये मद्रास प्रांताशी जोडले.१८७६-७८ च्या तीव्र दुष्काळात या क्षेत्रावर वाईट परिणाम झाले. येथे सुमारे २,००,००० दुष्काळी मृत्यू झाल्या. २० व्या शतकाच्या पहिल्या तीन दशकात जवळजवळ २०,००० कीटक-संबंधित मृत्यू आणि पाण्याची तीव्र कमतरता दिसून आली. भारतीय स्वातंत्र्य चळवळीत या भागाची महत्त्वपूर्ण भूमिका होती. []

स्वतंत्र कोंगु नाडू राज्य चळवळ

तामिळनाडूच्या पश्चिम जिल्ह्यातील प्रदेशांचा समावेश करून कोंगु नाडूचे स्वतंत्र राज्य निर्माण करण्याची मागणी होत आहे.[][] असे अनेक दावे झाले आहेत की राज्याच्या अर्थव्यवस्थेमध्ये सर्वात मोठे योगदान असूनही कोंगु नाडु प्रदेशाला बऱ्याचदा सलग सरकारांकडून दुर्लक्ष केले जाते. १० जिल्ह्यांचा समावेश असलेला संपूर्ण प्रदेशच्या महसूलात ४० टक्क्यांपेक्षा जास्त वाटा आहे. काही राजकीय पक्षांचा असा आरोप आहे की केंद्र व राज्य सरकारने देशाच्या या भागाकडे सातत्याने दुर्लक्ष केले आहे, आणि कोइंबतूर सारखे तमिळ नाडूमधील दुसरे मोठे शहर येथे असून आणि येथे खाजगी उद्युक्तपणाचे वातावरण असूनही सार्वजनिक क्षेत्रातील एक कंपनी देखील नाही, यावरून हे चांगले दिसून येते. कोंगुनाडू मक्कल कच्ची, कोंगुनाडू मक्कल देसिया कच्ची, कोंगुनाडू मुन्नेत्र कळगम, कोंगू वेल्लाला गौंडरगल पेरावई, तमिळनाडू कोंगू इलेग्नार पेरावई , कोंगू देसा मक्कल कच्ची, प्रदेशाच्या हक्कांसाठी लढा देण्याचा दावाकरणारे पक्ष प्रदेशात सक्रिय आहेत. [][][][][१०]


संदर्भ

  1. ^ "Census of India". Government of India. 2001. 12 मे 2008 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 9 मे 2018 रोजी पाहिले.
  2. ^ Thurston, Edgar; Rangachari, K. (1987). Castes and Tribes of Southern India. Asian Educational Services. pp. 156–. ISBN 978-81-206-0288-5.
  3. ^ "The perils of the past". The Hindu. 28 May 2005. 2012-11-10 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 26 February 2018 रोजी पाहिले.
  4. ^ "KMDK seeks separate Kongu Naadu state". The New Indian Express. 4 December 2019 रोजी पाहिले.
  5. ^ "Campaign Reaches Fever Pitch in Revenue-Rich Kongu Nadu". News18. 1 April 2019. 4 December 2019 रोजी पाहिले.
  6. ^ "India may have 50 states if new demands met". Times of India. 4 August 2013. 1 June 2016 रोजी पाहिले.
  7. ^ "Region's 'neglect' by governments prompted party formation". Chennai Online. 5 मार्च 2016 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 1 जून 2016 रोजी पाहिले.
  8. ^ "Beginning with message of conservation". The Hindu. Chennai, India. 10 April 2009. 8 November 2012 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 1 June 2016 रोजी पाहिले.
  9. ^ "KMP to work for progressive Western Tamil Nadu". The Hindu. Chennai, India. 29 April 2009. 8 November 2012 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 1 June 2016 रोजी पाहिले.
  10. ^ "Murmurs on Tamil Nadu's bifurcation resurface". The New Indian Express. 2021-07-01 रोजी पाहिले.