कॉन्टिनेन्टल एरलाइन्सअमेरिकेतील विमानवाहतूक कंपनी होती. ऑक्टोबर २०१० मध्ये ही कंपनी युनायटेड एरलाइन्समध्ये विलीन झाली.[२]. या विलीनीकरणाआधी कॉन्टिनेन्टल एरलाइन्स अमेरिकेतील प्रवासी-मैलानुसार चौथ्या क्रमांकाची मोठी विमानवाहतूक कंपनी होती. तेव्हा व आताही कॉन्टिनेन्टल अमेरिकेच्या ५० राज्यात, लॅटिन अमेरिका, कॅनडा, युरोप आणि आशिया-पॅसिफिक भागात विमानसेवा पुरवत असत. ही विमानसेवा मुख्यत्वे नुआर्क, क्लीव्हलॅंड, ह्युस्टन तसेच गुआमच्या ॲंतोनियो बी. वोन पॅट आंतरराष्ट्रीय विमानतळावरून कार्यरत होती. यातील बव्हंश सेवा आता युनायटेड एरलाइन्स पुरवते.