कॉकेशस
कॉकासस (आर्मेनियन: Կովկաս, अझरबैजानी: Qafqaz, जॉर्जियन: კავკასია, रशियन: Кавка́з, ओसेटिक: Кавказ, चेचन: Кавказ) हा युरोप व आशिया खंडांच्या सीमेवरील एक भौगोलिक प्रदेश आहे. कॉकासस पर्वतरांग ह्याच प्रदेशामध्ये आहे.
कॉकाससचे उत्तर कॉकासस व दक्षिण कॉकासस हे दोन विभाग मानले जातात.
- उत्तर कॉकाससः ह्या भागात रशियाच्या खालील प्रांतांचा समावेश होतो:
- उत्तर ओसेथिया-एलैनिया प्रजासत्ताक
- चेचन्या
- इंगुशेतिया
- काबार्डिनो-बाल्कारिया प्रजासत्ताक
- दागिस्तान प्रजासत्ताक
- एडिजिया प्रजासत्ताक
- काराचेय-चेर्केशिया प्रजासत्ताक
- क्रॅस्नोदर क्राय
- स्ताव्रोपोल क्राय
- दक्षिण कॉकाससः ह्या भागात खालील देशांचा समावेश केला जातो:
- आर्मेनिया
- अझरबैजान (नागोर्नो-काराबाख धरून)
- जॉर्जिया (दक्षिण ओसेशिया व अबखाझिया धरून)