के. अय्यप्पा पणिक्कर
के. अय्यप्पा पणिक्कर (१२ जुलै, इ.स. १९३० - २३ आॅगस्ट, इ.स. २००६) हे साहित्य अकादमी पुरस्कार व पद्मश्री पुरस्कार विजेते मल्याळम भाषेतील कवी होते. त्यांचा जन्म केरळातील कावालम या गावी झाला होता. विविध महाविद्यालये तसेच विद्यापीठांमधून त्यांनी इंग्रजी भाषेचे अध्यापन केले. गुरुग्रंथसाहेब आणि काही फ्रेंच भाषेतील पुस्तकांचे त्यांनी मल्याळीत अनुवाद केले.