Jump to content

के.व्ही. महादेवन

कृष्णकोईल वेंकटाचलम महादेवन (१४ मार्च १९१८, नागरकोविल - २१ जून २००१, चेन्नई) हा एक भारतीय संगीतकार होता. तो प्रामुख्याने दक्षिण भारतामधील चित्रपटसृष्टीमध्ये कार्यशील होता. त्याला १९६७ व १९८० सालचा सर्वोत्तम पार्श्वसंगीतकाराचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार तर १९९२ सालचा तेलुगू फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता.