Jump to content

के.व्ही. कृष्णराव

जनरल के.व्ही. कृष्णराव (इ.स. १९२४-३० जानेवारी, इ.स. २०१६:नवी दिल्ली, भारत) हे भारताचे लष्करप्रमुख होते. त्यांच्याच पुढाकाराने १९८० च्या दशकात भारतीय लष्कराच्या आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेने वेग घेतला होता.

९ ऑगस्ट १९४२ रोजी ते लष्करात दाखल झाले. ते दुसऱ्या महायुद्धादरम्यान ब्रह्मदेश, ईशान्य भारत व बलुचिस्तान आघाडीवर तैनात होते.

१९४७मध्ये काश्मीरमध्ये घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानविरोधातील युद्धातही त्यांनी भाग घेतला. देशाच्या फाळणीनंतर पूर्व व पश्चिम पंजाबमध्ये उसळलेला हिंसाचाराविरुद्ध त्यांनी कारवाई केली.

१९६५-६६ या काळात लडाखमध्ये एका ब्रिगेडचे, तर १९६९-७० या काळात जम्मू विभागातील पायदळाचे त्यांनी नेतृत्व केले.

१९७०-७२ या काळात नागालॅंड व मणिपूरमधील घुसखोरीविरुद्ध कारवाया करणाऱ्या पहाडी तुकडीचे नेतृत्व त्यांच्याकडे होते. याच काळात १९७१ च्या बांगलादेश मुक्तियुद्धात पूर्व आघाडीवर लढणाऱ्या भारतीय लष्कराचे नेतृत्व करताना त्यांनी आसामचा सिल्हेट जिल्हा ताब्यात घेण्यात व ईशान्य बांगलादेश मुक्त करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

३० जानेवारी, १९१६ रोजी जनरल कृष्णराव यांचे नवी दिल्ली येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

पुरस्कार आणि सन्मान

  • जम्मू-काश्मीरचे राज्यपालपद
  • परमविशिष्ट सेवा मेडल