Jump to content

केशर

                                                                                                        केशर

केशरला इंग्रजी मध्ये saffron असे म्हणतात.केशर हे गवत वर्गीय पिक असून या पिकास समुद्रसपाटी पासून २००० ते २५०० मीटर उंचीचा थंड बर्फाळ हवामानाचा प्रदेश आवश्यक असून पाण्याचा निचरा होणारी जमीन हवी असते.

केशर हे मनास व बुद्धीस उत्तेजन आणणारे असून केशरमुळे मनोविकार, ताणतणाव कमी होऊन मेंदूचे आरोग्य उत्तम ठेवते. गरोदर महिलांच्या पोटातील बाळाच्या वाढीसाठीही केशर उपयोगी आहे. तसेच स्तनदा मातेचे दुधही केशरमुळे वाढण्यास मदत होते. केशर मुळे चेहऱ्याचे सौंदर्य वाढते. केशर हे वात क्षामक असून केशर हे प्रकृतीने उष्ण असल्याने दुधाबरोबर केशर घेतांनी दोन ते तीन काड्या घेतल्या तरी पुरेशा ठरतात. आयुर्वेदानुसार केशरचे रोज सेवन करावे.

केशराचे फूल

आपण ज्यास केशर बोलतो ते फुलांचे पुंकेसर असते. अशा ओरीजनल केशरचा विक्रीभाव हा प्रतीग्राम ३०० ते ३५० रुपये असतो. बाजारामध्ये हिमालयीन केशर, अमेरिकन केशर, अफगाण केशर, चायना केशर सारख्या जातीचे केशर असून हिमालयीन केशर हे सर्वोत्तम केशर असून चायना केशर हे सर्वात हलके प्रतीचे केशर असून चायना केशर प्रतीग्राम २०० ते २५० रुपये प्रती ग्राम असतो. या व्यतिरिक्त बाजारात स्वस्त दरात उपलब्ध असणारे केशर हे भेसळ युक्त असते.

अशा विविधतेमुळे आपणास ओरीजनल केशर ओळखू येत नाही आणि केशर खरेदी करतांनी आपली फसवणूक होऊ शकते. काही घरगुती टेस्टद्वारे आपण ओरीजनल व भेसळ विरहीत केशर कोणते ते ओळखू शकतो.

                                                                                                                                                                                                                                                                                               *वास - काहीसा सुगंधी पण विशीष्ट असा छान वास असतो.                                                                                                                                                                                                                                   *आकार - २ ते २.५ cm लांब, टोकास गोलाकार निमुळते असते तर बुडाकडे जरासे चपटे व शेंड्याकडे मोठे असते.                                                                                                                                                                  *चव - थोडीसी कडवट असते.                                                                                                                                                                                                                                                                   *तेलकटपणा- पूर्ण ड्राय न झालेले केशर कागदावर टाकल्यानंतर त्याचा थोडासा तेलकटपणा कागदाला लागतो.                                                                                                                                                                 *दुधातील टेस्ट - दुधात टाकल्यावर केशर पिवळसर रंग सोडतो व केशर त्यात विरघळत नाही व ते लवचिक बनते.

असेच उत्तम व भेसळ विरहीत दर्जेदार हिमालयीन केशर प्रेफिक्स सारख्या काही नामांकित कंपन्यांनी बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध केलेले आहे.

डॉ. सुजाता पटवर्धन

संदर्भ - आहार संहिता

केशराच्या काड्या

केशर हे एक प्रकारच्या फुलाचे स्त्रीकेसर आहेत. ते वाळवून केशर तयार होते. हा पदार्थ मसाला म्हणून वापरतात. खाद्यपदार्थास चवरंग आणण्यासाठी दुग्धजन्य पदार्थात/मिठाईत याचा वापर होतो. उत्कृष्ट दर्जाच्या सुमारे १ किलो केशरासाठी अंदाजे ३ लाख फुले हवीत.

केशराच्या झुडपाची उंची १५ ते २५ सेंटिमीटर एवढी असते. त्याची पाने अरुंद आणि लांब असतात. ही झुडपे जगात भारत, स्पेन, इराण, इटली, जपान, रशिया, चीन या देशात प्रामुख्याने आढळतात.

औषधी गुणधर्म

आयुर्वेदात, कातडी, पोट, हृदय मधुमेह इत्यादी विकारांवर तसेच शक्तिवर्धक औषधी म्हणून केशराचा वापर करतात. शुद्ध केशरात उच्च प्रतीचे औषधी गुणधर्म असतात. याच्या उत्पादनाच्या अल्पतेमुळे, यास बाजारात बराच भाव असतो. त्यामुळे, यात कागदाचे बारीक तुकडे, गवत, मक्याच्या कणसाचे केस इत्यादी पदार्थाची भेसळ होते.

केशराचा वापर देवपूजेत देखील केला जातो.केशर खाल्ल्यामुळे मन प्रसन्न राहते व हृदयासाठी फायदेशीर असते.

केशराचे दुर्लक्षित आरोग्यलाभ

(अवंती कारखानीस)

केशरात ए जीवनसत्त्व, फोलिक अ‍ॅसिड, तांबे, पोटॅशिअम, कॅल्शिअम, मॅंगनीज, लोह, सेलेनियम, झिंक, मॅग्नेशिअम आणि इतरही काही पोषक घटक मिळतात. त्याशिवाय केशरात लाईकोपिन, अल्फा कॅटरीन, बीटा कॅरोटीन हे घटकही असतात. हे घटक काही आजारांपासून शरीराचा बचाव करतात. केशर आरोग्यासाठी चांगले असतेच पण सौंदर्यासाठीही त्याचा फायदा होतो. केशराचा वापर बहुतेकदा पक्‍वान्‍न तयार करताना केला जातो. त्याचा रंग आणि स्वाद पदार्थाची लज्जत वाढवतो. केशर प्रकृतीने उष्ण असते. त्यामुळेच केशराचे सेवन हिवाळ्यात करणे लाभदायक असते. केशराचे माहीत नसलेले काही फायदे असे :

ताप दूर होतो : केशरामुळे ताप, सर्दी, कफ दूर करण्यास मदत होते. त्यासाठी एक ग्लास दुधामध्ये चिमूटभर केशर आणि मध मिसळून पितात. त्याशिवाय केशरात पाणी घालून केलेला लेप मानेवर व छाती वर लावल्यास हिवाळ्यात होणाऱ्या सर्दीपासून आराम मिळतो.

चेहऱ्याचे सौंदर्य : यासाठी केशरामध्ये चंदन आणि दूध मिसळून तो फेसपॅक चेहऱ्याला लावतात. वीस मिनिटांनंतर चेहरा कोमट पाण्यात धुतात. आठवड्यातून एक दोन वेळा हा पॅक लावल्यास चेहऱ्याचा रंग उजळतो.

वयवाढ रोखते : केशरामध्ये ॲंटिऑक्सिडंट असल्याने व्यक्‍तीचे वय वाढू देत नाही. कच्च्या पपईत चिमूटभर केशर टाकून ते मिसळून चेहऱ्यावर लावल्यास स्वच्छ, निरोगी आणि मुलायम करण्यात मदत होते.

नैराश्यापासून मुक्‍ती : ज्या व्यक्‍तींना नैराश्य येते त्यांच्यासाठी केशर खूप उपयुक्‍त ठरते. केशरामध्ये सेरोटिनन आणि इतर रसायने असतात. त्यामुळे केसर माणसाला आपल्याला अौदासिन्य येऊ देत नाही. रोज केशराचे दूध प्यायल्यास रंग उजळतोच परंतु नैराश्याची समस्याही दूर होते.

द‍ृष्टी : हल्ली लहान मुलांनाही कमी दिसणे, चष्मा लागणे या गोष्टी सर्रास पाहायाल मिळतात. रोज केसराचे सेवन केल्यास हा त्रास कमी होऊ शकतो.

मासिक पाळीच्या वेदना : काही महिलांना मासिक पाळीत पोटात वेदना होतात. चिडचिड होते, थकवा, सूज येणे यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. रोज केशराचे दूध किंवा चहा प्यायल्यास फायदा होतो.

अस्थमा किंवा दम्यापासून बचाव : हिवाळ्यात दमेकरी व्यक्‍तींना खूप त्रास होतो. त्यासाठी दिवसातून ३-४ वेळा केशराचा चहा प्यायल्यास दम्याची समस्या दूर होते.

डोकेदुखी होते बरी : चंदनाबरोबरच केशर मिसळून ते कपाळावर लावल्यास डोळे, मेंदू यांच्यापर्यंत ऊर्जा पोहोचते. हा लेप वापरल्याने डोकेदुखीपासून मुक्‍ती मिळते.

संदर्भ

[]

  1. ^ https://hi.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%B0