केलुचरण मोहपात्रा
भारतीय ओडिसी नर्तक व पद्मभूषण पुरस्कृत ओरिसातील पाहिली व्यक्ती | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
स्थानिक भाषेतील नाव | କେଳୁଚରଣ ମହାପାତ୍ର | ||
---|---|---|---|
जन्म तारीख | जानेवारी ८, इ.स. १९२६, ऑगस्ट १, इ.स. १९२६ Raghurajpur | ||
मृत्यू तारीख | एप्रिल ७, इ.स. २००४ भुवनेश्वर | ||
कार्य कालावधी (प्रारंभ) |
| ||
नागरिकत्व |
| ||
व्यवसाय |
| ||
मातृभाषा | |||
अपत्य |
| ||
वैवाहिक जोडीदार |
| ||
पुरस्कार |
| ||
| |||
केलुचरण मोहपात्रा (जन्म : ८ जानेवारी १९२६; - ७ एप्रिल २००४ ) हे अभिजात भारतीय ओडिसी नर्तक आणि गुरू होते. [१] त्यांनी विसाव्या शतकात ओडिसी नृत्य कलेचे पुनरुज्जीवन केले.[२] पद्मविभूषण हा पुरस्कार मिळवणारे ते ओरिसातील पहिली व्यक्ती आहेत.[३]
प्रारंभीचे आयुष्य
भगवान जगन्नाथाला प्रसन्न करण्यासाठी सादर केला जाणारा गोतीपुआ हा ओरिसातील पारंपरिक नृत्यप्रकार गुरू केलुचरण मोहपात्रा यांनी तरुणपणीच सादर केला. यात स्त्रियांची वेशभूषा करून पुरुष नृत्य करीत असत.
कलेचे पुनरुज्जीवन
नंतरच्या आयुष्यात त्यांनी गोतीपुआ व माहारी या नृत्य प्रकारांत संशोधन केले, व त्यांतून त्यांनी एकूणच ओडिसी नृत्याची पुनर्बांधणी केली.[४]गुरू केलुचरण मोहपात्रा हे तालवाद्यवादनात कुशल होते. मृदंग, पखवाज व तबला ह्यांतील त्यांचे कौशल्य त्यांनी केलेल्या नृत्यरचनांतून दिसून येते. पारंपरिक पट्टचित्रकला प्रकारातही ते प्रवीण होते.
नृत्यसंस्था
गुरू केलुचरण मोहपात्रा, त्यांच्या पत्नी लक्ष्मीप्रिया व मुलगा रतिकांत ह्यांनी सन १९९३मध्ये सृजन ही नृत्यसंस्था स्थापन केली.
सन्मान व पुरस्कार
- संगीत नाटक अकादमी पुरस्कार - इ.स.१९६६
- पद्मश्री- इ.स.१९७४
- पद्म भूषण -इ.स. १९८८
- संगीत नाटक अकादमी फेलोशिप- इ.स.१९९१
- पद्म विभूषण- इ.स. २०००
- मध्य प्रदेश शासनाकडून कालिदास सन्मान
संदर्भ
- ^ Citaristi, Ileana (2001-01-01). The Making of a Guru: Kelucharan Mohapatra, His Life and Times (इंग्रजी भाषेत). Manohar. ISBN 9788173043697.
- ^ Verma, Archana (2011-01-18). Performance and Culture: Narrative, Image and Enactment in India (इंग्रजी भाषेत). Cambridge Scholars Publishing. ISBN 9781443828321.
- ^ KISSELGOFFOCT., ANNA (OCT. 19, 2000). "DANCE REVIEW; Sculptural And Sensual, It's Odissi".
|date=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ Sangeet Natak (इंग्रजी भाषेत). Sangeet Natak Akademi. 2002.