Jump to content

केप ऑफ गुड होप

केप ऑफ गुड होप (आफ्रिकान्स: Kaap die Goeie Hoop, डच: Kaap de Goede Hoop, पोर्तुगीज: Cabo da Boa Esperança) हा दक्षिण आफ्रिकेतील अटलांटिक महासागराच्या किनाऱ्यावरील भूशिर आहे. अनेकदा चुकीने केप ऑफ गुड होपचा आफ्रिकााचे सर्वात दक्षिणेकडील टोक असा उल्लेख केला जातो, पण वास्तविकपणे केप अगुलास हे आफ्रिका खंडाचे सर्वात दक्षिणेकडील टोक आहे.

ऐतिहासिक काळात सुएझचा कालवा तयार होईपर्यंत युरोपातुन भारतीय उपखंडाकडे प्रवास करणाऱ्या सागरी बोटींना आफ्रिका खंडाला वळसा घालून यावे लागत असे. केप ऑफ गुड होप भूशिरापर्यंत पोचणे हा ह्या प्रवासातील एक मोठा टप्पा मानला जात असे. इ.स. १४८८ सालातल्या मे महिन्यात बार्तुलुम्यू दियास हा पोर्तुगीज खलाशी या भूशिरापर्यंत सर्वप्रथम पोचला.