केपें तालुका
केपे हा गोव्याच्या दक्षिण गोवा जिल्ह्यातील एक तालुका आहे.
केपे तालुका हा निसर्गाने नटलेला ,सौदर्याने बहरलेला असा तालुका आहे. हे एक छोटे शहर आहे. तसेच कुडचडे आणि केपें असे दोन मतदारसंघ यात येतात. कुडचडे शहरात अनेक सुंदर मंदिरे आहेत. श्री पुरुषम्हारू देवस्थान, श्री सातेरी देवस्थान,श्री शिवनाथ मंदिर,श्री गणेश मंदिर,श्री संतोषी मंदिर (कुडचडे),तसेच श्री बेताळ मंदिर,श्री लिंगदेव,श्री शिवनाथ,श्री धानुगाडी (काकोडा) या गावात आहे. केपें तालुक्यात दत्त मंदिराच्या बाजूला कुशावती नदीचे वास्तव आहे. या तालुक्यात सरकारी महाविद्यालय आहे. या विद्यालयात अनेक भागातून मुले शिकायला येतात. आधी केपें या तालुक्याचे नाव 'कुसमण' असे होते. कालांतराने त्याचे केपें असे नाव झाले. तसेच इथे भूतनाथ पर्वत हे केपे परिसरातील जागरूक देवस्थान आहे.