Jump to content

केन्सिंग्टन ओव्हल

२००७ क्रिकेट विश्वचषक स्पर्धेदरम्यान केन्सिंग्टन ओव्हल

केन्सिंग्टन ओव्हल (Kensington Oval) हे कॅरिबियनमधील बार्बाडोस देशाच्या ब्रिजटाउन शहरामधील एक क्रिकेट स्टेडियम आहे. केन्सिंग्टन ओव्हल कॅरिबियनमधील सर्वात प्रतिष्ठेच्या क्रिकेट मैदानांपैकी एक मानले जाते व येथे आजवर अनेक महत्त्वाचे सामने खेळवले गेले आहेत. २००७ क्रिकेट विश्वचषकाचा अंतिम सामना येथेच खेळवला गेला होता.

क्रिकेट व्यतिरिक्त बार्बाडोस फुटबॉल संघ देखील काही सामने येथून खेळतो.

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे

गुणक: 13°6′18.18″N 59°37′21.29″W / 13.1050500°N 59.6225806°W / 13.1050500; -59.6225806