केंटकी
केंटकी Commonwealth of Kentucky | |||||||||||
अमेरिका देशाचे राज्य | |||||||||||
| |||||||||||
अधिकृत भाषा | इंग्लिश | ||||||||||
राजधानी | फ्रॅंकफोर्ट | ||||||||||
मोठे शहर | लुईव्हिल | ||||||||||
क्षेत्रफळ | अमेरिकेत ३७वा क्रमांक | ||||||||||
- एकूण | १,०४,६५९ किमी² | ||||||||||
- रुंदी | २२५ किमी | ||||||||||
- लांबी | ६१० किमी | ||||||||||
- % पाणी | १.७ | ||||||||||
लोकसंख्या | अमेरिकेत २६वा क्रमांक | ||||||||||
- एकूण | ४३,३९,३६७ (२०१० सालच्या गणनेनुसार) | ||||||||||
- लोकसंख्या घनता | ४१.५/किमी² (अमेरिकेत २४वा क्रमांक) | ||||||||||
संयुक्त संस्थानांमध्ये प्रवेश | १ जून १७९२ (१५वा क्रमांक) | ||||||||||
संक्षेप | US-KY | ||||||||||
संकेतस्थळ | kentucky.gov |
केंटकी (इंग्लिश: Commonwealth of Kentucky) हे अमेरिकेच्या मध्य-दक्षिण भागातील एक राज्य आहे. केंटकी हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील ३७वे तर लोकसंख्येच्या दृष्टीने २६व्या क्रमांकाचे राज्य आहे.
केंटकीच्या उत्तरेला ओहायो व इंडियाना, वायव्येला इलिनॉय, दक्षिणेला टेनेसी, नैऋत्येला मिसूरी तर पूर्वेला व्हर्जिनिया व वेस्ट व्हर्जिनिया ही राज्ये आहेत. फ्रॅंकफोर्ट ही केंटकीची राजधानी असून लुईव्हिल हे सर्वात मोठे शहर आहे. लेक्सिंग्टन हे देखील येथील एक मोठे शहर आहे.
जगातील सर्वात जास्त लांबीच्या गुहांचे जाळे असलेले मॅमथ केव्ह राष्ट्रीय उद्यान केंटकी राज्यातच आहे. येथील घोड्यांच्या शर्यती तसेच ब्लूग्रास नावाचे एक विशिष्ट प्रकारचे गवत प्रसिद्ध आहेत.
गॅलरी
- केंटकीमधील एक घोड्यांचा तबेला.
- अब्राहम लिंकनचे जन्मस्थान.
- केंटकीमधील प्रमुख रस्ते व महामार्ग
- केंटकी राज्य संसद भवन
- केंटकीचे प्रतिनिधित्व करणारे २५ सेंट्सचे नाणे.