Jump to content

कृष्णाजी गोपाळ कर्वे

कृष्णाजी गोपाळ कर्वे (इ.स. १८८७; नाशिक, महाराष्ट्र - एप्रिल १९, इ.स. १९१०; ठाणे, महाराष्ट्र) हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक क्रांतिकारक होते. महाराष्ट्रातील नाशिक नगरातील अभिनव भारत संघटना नावाच्या गुप्त क्रांतिकारक संघटनेचे ते सदस्य होते. डिसेंबर, इ.स. १९०९ मध्ये अनंत कान्हेरे ह्यांनी नाशकाचा कलेक्टर जॅक्सन याची हत्या केली, त्या खटल्यात कर्वे ह्यांनाही फाशीची शिक्षा झाली. १९ एप्रिल, इ.स. १९१० रोजी ठाणे तुरुंगात त्यांच्या शिक्षेची अंमलबजावणी झाली. ठाणे तुरुंगात सध्या कर्वे ह्यांचे स्मारक आहे.