Jump to content

कृष्णाजी अर्जुन केळुसकर

कृष्णाजी अर्जुन केळुसकर
जन्म २० ऑगस्ट, इ.स. १८६०
केळुस, महाराष्ट्र, भारत
मृत्यू १४ ऑक्टोबर, १९३४ (वय ७४)
महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्वभारत भारतीय
कार्यक्षेत्रसाहित्य
भाषामराठी
साहित्य प्रकारकथा, कादंबरी

कृष्णाजी अर्जुन केळुसकर (२० ऑगस्ट, १८६० - १४ ऑक्टोबर, १९३४) हे मराठी लेखक होते. केळुस या वेंगुर्ल्यातील गावी जन्मलेले कृष्णराव अर्जुन केळुसकर हे मराठीतील आद्य शिवचरित्रकार आहेत असे म्हणतात.[ संदर्भ हवा ] त्यांनी बुद्धचरित्रही लिहिले आहे. केळुसकर हे जातीने मराठा (भंडारी ) होते.[ संदर्भ हवा ]

कारकीर्द

इ.स.१९०३ साली केळुसकरांनी छत्रपती शिवाजी महाराज हे चरित्र लिहिण्यास सुरुवात केली. याची पहिली आवृत्ती इ.स. १९०७ साली मराठा प्राविडंड फंडातर्फे प्रसिद्ध झाली. तत्कालीन उपलब्ध असलेली अनेक कागदपत्रे, बखरी, पत्रव्यवहार याचा अभ्यास करून त्यांनी ते ६०० पानी शिवचरित्र लिहिले. या आवृत्तीला शाहू महाराज यांनी मदत केली. कागल, बडोदा संस्थानांनी यासाठी त्यांना पारितोषिके दिली. हे चरित्र हिंदी व गुजराती भाषेत अनुवादित होवुन प्रसिद्ध झाले.[ संदर्भ हवा ] शिवाजी महाराजांची नवी उपलब्ध माहिती घेवुन मूळ ग्रंथात सुधारणा करून नवी आवृत्तीही प्रसिद्ध करायला घेतली. मनोरंजनकार का.र. मित्र यांच्या छापखान्यात दोन्ही ग्रंथांची छपाईही झाली. पण यात त्यांना प्रचंड कर्ज झाले. इंदोर संस्थानचे अधिपती सवाई तुकोजीराव होळकर यांनी तत्कालीन रु. २४०००/- देऊन केळूसकरांना कर्जमुक्त तर केलेच पण इंग्रजी आव्रुत्तीच्या ४००० प्रती घेऊन जगभरच्या मुख्य इंग्रजी ग्रंथालयांना मोफत वाटल्या.[ संदर्भ हवा ] या ग्रंथाच्या आजवर ७ आवृत्त्या प्रसिद्ध झाल्या असुन एक आवृत्ती बामसेफनेही संपादित प्रसिद्ध केली आहे. वरदा प्रकाशनाने इ.स. १९९१ ते इ.स. २०१० या काळात ४ आवृत्त्या प्रसिद्ध केल्या असून मूळ स्वरूप जपले आहे. केळुस्करांनी स्वतः लिहिलेले बुद्धचरित्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मॅट्रीक परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या कौतुक संभारभात भेट म्हणून दिले.[ संदर्भ हवा ]

साहित्य [ संदर्भ हवा ]

  1. आध्यात्मिक ज्ञानरत्नावली (१८९४)
  2. गौतम बुद्ध यांचे चरित्र
  3. तुकाराम महाराजांचे चरित्र
  4. छत्रपती शिवाजी महाराज (१९०७)
  5. फ्रान्सचा जुना इतिहास
  6. सेनेका व एपिक्टेटस यांची बोधवचने

संदर्भ