Jump to content

कृती सेनॉन

कृती सनॉन
जन्म २७ जुलै, १९९० (1990-07-27) (वय: ३४)
दिल्ली, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र चित्रपट
कारकीर्दीचा काळ २०१० - चालू
प्रमुख चित्रपटपानिपत

कृती सनॉन (२७ जुलै १९९० ) ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २०१४ साली एका तेलुगू सिनेमामध्ये भूमिका करून अभिनय कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या कृतीने त्याच साली प्रदर्शित झालेल्या हिरोपंती ह्या चित्रपटामध्ये टायगर श्रॉफच्या नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. हिरोपंतीमधील भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. २०१५ सालच्या दिलवाले ह्या चित्रपटात देखील कृती आघाडीच्या भूमिकेत चमकली.

आरंभीचे आयुष्य

कृतीचा जन्म २७ जुलै १९९० रोजी नवी दिल्ली येथे राहुल सनॉन या चार्टर्ड अकाउंटंट आणि गीता सनॉन या दिल्ली विद्यापीठाचे भौतिकशास्त्र प्राध्यापक यांच्याकडे झाला. तिचे कुटुंब पंजाबी आहे. तिला एक छोटी बहीण असून तिचे नाव नूपुर सनॉन आहे. तिने दिल्ली पब्लिक स्कूल, आर के पुरम येथे शिक्षण घेतले आणि नंतर नोएडाच्या जयपी इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी येथून इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनीअरिंगमध्ये बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी पदवी मिळविली.


प्रसिद्ध चित्रपट

हीरोपंती, दिलवाले,लुका चुप्पी, हाउसफुल 4,

हम दो हमारे दो, मिनी

चित्रपट

वर्ष चित्रपट भूमिका नोट्स
२०१४ १: नेन्नोकाडिनेसमीरा तेलुगू पदार्पण चित्रपट
२०१४ हिरोपंतीडिंपी हिंदी पदार्पण चित्रपट
२०१५ डोहचेमीरा तेलुगू चित्रपट
२०१५ दिलवालेइशिता मलिक
२०१६ राबतासायरा/सायबा
२०१७ बरेली की बर्फीबिट्टी
२०१८ स्त्रीआयटम गर्ल "आओ कभी हवेली पे" गाण्यात
२०१९ लुक्का चुप्पीरश्मी
२०१९ कलंकआयटम गर्ल "ऐरा गेला" गाण्यात
२०१९ अर्जुन पटियालाकिती रंधावा
२०१९ हाऊसफुल्ल ४राजकुमारी मधु/कृती
२०१९ पानिपतपार्वती बाई पेशवे
२०१९ पती पत्नी और वोनेहा खन्ना पाहुणी कलाकार
२०२० अंग्रेजी मिडीयमस्वतः
२०२१ मिमीमिमी

बाह्य दुवे

  • इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील कृती सेनॉन चे पान (इंग्लिश मजकूर)