कुशोक बकुला रिम्पोचे विमानतळ
लेह कुशोक बकुला रिम्पोचे विमानतळ | |||
---|---|---|---|
लेह कुशोक बकुला रिम्पोचे विमानतळ | |||
आहसंवि: IXL – आप्रविको: व्हीएपीओ IXL | |||
माहिती | |||
विमानतळ प्रकार | सेना/सार्वजनिक | ||
कोण्या शहरास सेवा | लेह | ||
स्थळ | लेह, जम्मू आणि काश्मीर, भारत | ||
समुद्रसपाटीपासून उंची | १०,६८२ फू / ३,२५६ मी | ||
गुणक (भौगोलिक) | 34°08′09″N 077°32′47″E / 34.13583°N 77.54639°E | ||
धावपट्टी | |||
दिशा | लांबी | पृष्ठभाग | |
मी | फू | ||
०६/२४ | १५२ | ५०० | डांबरी धावपट्टी |
०७/२५ | १५२ | ५०० | डांबरी धावपट्टी |
०७डावी/२५उजवी | २,७५५ | ९,०४० | डांबरी धावपट्टी |
लेह कुशोक बकुला रिम्पोचे विमानतळ (आहसंवि: IXL, आप्रविको: VILH) हा भारताच्या जम्मु आणि काश्मीर राज्यातील लेह शहराचा विमानतळ आहे. समुद्रसपाटीपासून ३,२५६ उंचीवर असलेला हा विमानतळ जगातील सर्वात उंच विमानतळांपैकी एक आहे. याला लद्दाखमधील नेता कुशोक बकुला रिम्पोचेचे नाव देण्यात आले आहे.
सुरक्षा
काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या कारवायांमुळे या विमानतळावर इतर विमानतळांपेक्षा जास्त सुरक्षा बाळगली जाते. विमानतळावर तसेच आसपास अनेक पोलीस व भारतीय सैनिक सतत गस्त घालीत असतात. अलीकडेपर्यंत विमानातील प्रवाशांना हातात काहीही सामान घेउन जाण्यास परवानगी नव्हती. लेह व त्या आसपासच्या पर्वतांतून साधारणतः दुपारी वाहणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे विमानांचे आवागमन सहसा सकाळी पर्यंतच केले जाते.
विमानसेवा व गंतव्यस्थान
विमान कंपनी | गंतव्य स्थान . |
---|---|
एर इंडिया | दिल्ली, जम्मू, श्रीनगर |
गोएर | दिल्ली, जम्मू |
जेट एरवेझ | दिल्ली |
हे सुद्धा पहा
- कामदो बांग्दा विमानतळ - ४,३३४ मी उंचीवरील जगातील सगळ्यात उंच प्रवासी विमानतळ
- एल आल्तो आंतरराष्ट्रीय विमानतळ - ४,०६१ मी उंचीवरील प्रवासी विमानतळ
बाह्य दुवे
- लेह कुशोक बकुला रिम्पोचे विमानतळाची माहिती (इंग्लिश भाषेत). १९ सप्टेंबर २०१३ रोजी मूळ पान पासून संग्रहित.CS1 maint: unrecognized language (link)
- विमानतळ माहिती VILH वर्ल्ड एरो डाटा. माहिती अपडेट ऑक्टोबर २००६.Source: DAFIF.
- साचा:GCM
- एव्हीएशन सेफ्टी नेटवर्कच्या संकेतस्थळावर, IXL या विमानतळावरील अपघातांचा इतिहास बघा