Jump to content

कुलाचार


विविध महत्त्वाचे कार्यप्रसंगाचे वेळी,वेगवेगळ्या कुळात, केल्या जाणारे कुलदैवतपूजन, होम ,हवन इत्यादी धार्मिक क्रियांना कुलाचार म्हणतात.कुलाचार अथवा कुळाचार म्हणजे एखाद्या कुटुंबामध्ये धार्मिक आचाराचे/व्रतवैकल्याचे पालन करतांना, वंशपरंपरेने चालत आलेल्या काही विशिष्ट पद्धतींचे अवलंबन करणे आहे.एकच सण/धार्मिक कृत्य साजरे करतांना वेगवेगळ्या प्रांतामधील लोकांच्या वेगवेगळ्या पद्धती असतात.त्याप्रमाणेच, वेगवेगळ्या कुटुंबामध्येही कुलाचार वेगवेगळा असतो.