कुलगुरू
विद्यापिठाच्या प्रमुखास कुलगुरू म्हणतात.त्या त्या राज्याचे राज्यपाल हे पदसिद्ध कुलपती व राज्यातील सर्व कुलगुरूंचे प्रमुख असतात. कुलगुरूच्या निवडीसाठी राज्यशासनाने काही निकष ठरविले आहेत.
शैक्षणिक अर्हता
- कोणत्याही विद्या शाखेतील डॉक्टरेट ही पदवी आणि शैक्षणिक क्षेत्रातला चांगला पूर्वेतिहास.
- विद्यापिठ स्तरावर किंवा नावाजलेल्या संस्थेमध्ये पदवी किंवा पदव्युत्तर पातळीवरील कमीत कमी १५ वर्षाचा अध्यापन आणि संशोधनाचा अनुभव.
- पी.एच.डी. नंतर किमान पाच संशोधन पेपर मान्यताप्राप्त आंतरराष्ट्रीय संशोधन पत्रिका मध्ये प्रकाशित केलेले असावे.सोबतच मान्यताप्राप्त विद्या शाखेतील गुणात्मक दर्जा असलेली व राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर उच्च शिक्षणासाठी संदर्भ ग्रंथ म्हणुन वापरल्या जातील अशी पुस्तके प्रकाशित केलेली असावीत.
- विद्यापिठातील विभागप्रमुख, वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य (प्राध्यापक दर्जाचे), राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय उन्नत शिक्षण संस्थांचे प्रमुख म्हणून किमान पाच वर्षाचा अनुभव.
- महत्त्वपूर्ण अशा किमान एका संशोधन प्रकल्पाचे संचालन केलेले असावे.
- आंतरराष्ट्रीय संस्था किंवा संघटना यांच्या देशाबाहेरील कार्यशाळा, परिसंवाद आणि परिषदामध्ये सहभाग.
- उच्च शिक्षणाशी संबंधित आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कार्यशाळा, परिसंवाद आणि परिषदांचा देशात आयोजनाचा अनुभव.
- विद्यापिठाच्या विविध प्राधिकरणांवरील कार्यानुभव.
- पी.एच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचा अनुभव.
इत्यादी बाबींचा यात समावेश आहे.
कशी निवड करतात
विद्यापिठात स्थायी अधिवक्त्यांची एक विद्वत परिषद असते. त्या विद्यापिठातील सर्व स्थायी अधिवक्ते या परिषदेचे सदस्य असतात.
कुलगुरूच्या नियुक्तीसाठी एक निवड समिती स्थापन करण्यात येते. त्यात व्यवस्थापन परिषद व विद्वत परिषद यामधून संयुक्तपणे एक बैठक घेउन एक सदस्य नामित करण्यात येतो. यात अभ्यास मंडळाचे अध्यक्ष हे विद्वत परिषदेचे सदस्य असतात.
राज्य शासनाकडुन कुलगुरुपदाची जाहिरात देण्यात येते.यावर प्राप्त अर्जांची छाननी निवड समिती करते. कुलपती या समितीच्या अध्यक्षांची नियुक्ती करतात.या समितीत एकूण तीन सदस्य असतात.राज्य शासनाच्या उच्च शिक्षण विभागाचे प्रधान सचिव व त्या विद्यापिठाच्या व्यवस्थापन परिषद व विद्वत परिषद यातर्फे नामित करण्यात आलेला सदस्य यात असतो. ही समिती शासनाच्या विहित निर्देशानुसार अर्जांची छाननी करते व त्यातील पाच उमेदवारांची कुलपतीकडे शिफारस करते.यानंतर कुलपती प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे कुलगुरूंची निवड करतात.ही प्रक्रिया सुमारे २-३ महिने चालते.