कुर्ला विधानसभा मतदारसंघ
कुर्ला विधानसभा मतदारसंघ - १७४ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. हा मतदारसंघ मुंबई उपनगर जिल्ह्यात येतो. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, कुर्ला मतदारसंघात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जनगणना वॉर्ड क्र. १९७६, जनगणना वॉर्ड क्र. १९७७ मधील इन्युमरेशन ब्लॉक १ ते ८६, ८९ ते २६४, २६७ ते २७१, २७४, २७५, २८९, २९१ ते २९४, जनगणना वॉर्ड क्र.२१७९ मधील इन्युमरेशन ब्लॉक १ ते ८६, ५०८ ते ६००, ६१२ ते ६१६ आणि जनगणना वॉर्ड क्र. १९७५ मधील इन्युमरेशन ब्लॉक १ ते २७, २९ ते ४६, १२७ ते १४७ आणि १५६ ते २०१ यांचा समावेश होतो. कुर्ला हा विधानसभा मतदारसंघ मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात मोडतो आणि हा मतदारसंघ अनुसूचित जाती - SC च्या उमेदवारांसाठी राखीव आहे.[१][२]
शिवसेनेचे मंगेश अनंत कुडाळकर हे कुर्ला विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]
आमदार
वर्ष | आमदार[४] | पक्ष | |
---|---|---|---|
२०१९ | मंगेश अनंत कुडाळकर | शिवसेना | |
२०१४ | मंगेश अनंत कुडाळकर | शिवसेना | |
२००९ | मिलिंद (अण्णा) कांबळे | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष |
निवडणूक निकाल
महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २००९ | ||
---|---|---|
कुर्ला | ||
उमेदवार | पक्ष | मत |
मिलिंद कांबळे | राष्ट्रवादी | ४१,८९१ |
मंगेश कुडाळकर | शिवसेना | ३४,९२० |
सदाशिव किसन लोखंडे | मनसे | ३३,९६७ |
अविनाश महातेकर | रिपाई (A) | ५,०१६ |
राजेश लक्ष्मण लोखंडे | बसपा | २,१३२ |
सादोदि झहीर अहमद गाझी | अपक्ष | १,००० |
चंद्रकांत कोंडीबा प्रभाले | अपक्ष | ९३३ |
अनिल बंसी ओवाळ | भाबम | ५०२ |
विजय नामदेव वाघोडे | भारतीय संयुक्त धर्मनिरपेक्ष काँग्रेस पक्ष | ४७९ |
रवींद्र पवार | शिपा | ३५८ |
बाह्य दुवे
- "भारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर कुर्ला विधानसभा मतदारसंघ निवडणुकांतील इ.स. १९७८ पासूनच्या निवडणुकांचे पक्षनिहाय मतदानाच्या टक्केवारीचे तुलनात्मक विश्लेषण" (इंग्रजी भाषेत). २० जुलै २०१३ रोजी पाहिले.
- ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). १२ October २००९ रोजी पाहिले.
- ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
- ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
- ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".