कुरुफ
कुरुफ Kurów | ||
पोलंडमधील शहर | ||
कुरुफमधील एक चर्च | ||
| ||
कुरुफ | ||
देश | पोलंड | |
प्रांत | लुबेल्स्का | |
स्थापना वर्ष | अंदाजे १२वे शतक | |
क्षेत्रफळ | ११.३३ चौ. किमी (४.३७ चौ. मैल) | |
लोकसंख्या (२०१०) | ||
- शहर | २,८२६ | |
- घनता | २४९ /चौ. किमी (६४० /चौ. मैल) | |
प्रमाणवेळ | मध्य युरोपीय प्रमाणवेळ |
कुरुफ (पोलिश: Kurów; उच्चार ) हे पोलंड देशाच्या उत्तर भागातील बाल्टिक समुद्रकिनाऱ्यावर वसलेले पोलंडचे एक प्रमुख शहर आहे. हे लुब्लिन व पुलावे गावांच्या दरम्यान कुरौका नदीवर वसलेले आहे.
या गावाची वस्ती २,८२६ (२०१०चा अंदाज) आहे. इ.स. १४३१ व इ.स. १४४२च्या दरम्यान या गावाला शहराचा दर्जा देण्यात आला होता. त्याकाळात हे गाव अन्नबाजार व कातडी मालाचे उत्पादनकेंद्र म्हणून ख्यात होते. इ.स. १६७०मध्ये येथे प्लेगचा प्रादुर्भाव झाला व लोकसंख्या कमी झाल्यामुळे याचा शहराचा दर्जा काही वर्षांकरता काढून घेण्यात आला. इ.स. १७९५ च्या पोलंडच्या फाळणीनंतर हे शहर ऑस्ट्रियाचा भाग झाले व इ.स. १८१५मध्ये पोलंड संस्थानात आले. इ.स. १९१८ पासून कुरुफ पोलंडमध्येच आहे. दुसऱ्या महायुद्धात सप्टेंबर ९, इ.स. १९३९ रोजी जर्मन लुफ्तवाफेने येथे बॉम्बफेक केली होती.
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत