Jump to content

कुरुंदवाड संस्थान (थोरली पाती)

कुरुंदवाड संस्थान
कुरुंदवाड संस्थान
[[मराठा साम्राज्य|]] इ.स. १७३३इ.स. १९४८
ध्वज
राजधानीकुरुंदवाड
सर्वात मोठे शहरकुरुंदवाड
शासनप्रकारराजतंत्र
राष्ट्रप्रमुखपहिला राजा: त्रिंबक हरि पटवर्धन
अंतिम राजा: विनायाकराव हरीहरराव (नानासाहेब) पटवर्थन
अधिकृत भाषामराठी भाषा
लोकसंख्या४२,००० (इ.स.१९०१)
–घनता८९ प्रती चौरस किमी


पटवर्धन घराण्याचे मूळ पुरुष हरभट पटवर्धन ह्यांचे तृतीय पुत्र त्रिंबक हरी पटवर्धन तथा अप्पासाहेब हे कुरुंदवाड संस्थानाचे संस्थापक समजले जातात. मराठा सरदार राणोजी घोरपडे यांनी, अप्पासाहेबाकडून कर्ज घेतले होते. त्याची परतफेड म्हणून् घोरपड्यांनी कुरुंदवाड हे आपले गाव अप्पाला बहाल केले.

अप्पासाहेबांची कारकीर्द इ.स.१७३३ ते इ.स. १७७१ अशी होती. पुढे इ.स. १८११ मध्ये कुरुंदवाडचे कुरुंदवाड आणि शेडबाळ असे दोन् राज्यात विभाजन झाले. घराण्याला वारस नसल्याने शेडबाळ ब्रिटिश साम्राज्यात विलिन झाले. इ.स.१८५४ मध्ये कुरुंदवाड संस्थान पुन्हा विभागले जाऊन थोरली पाती रघुनाथरावाकडे तर धाकटी पाती विनायकरावाकडे गेली. स्वातंत्र्यानंतर दोन्ही संस्थाने भारतात विलिन झाली. []

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "संस्थान कुरुंदवाड". लोकसत्ता.

हे सुद्धा पहा

मिरज संस्थान (थोरली पाती)