कुरिल बेटे
कुरिल द्वीपसमूह (रशियन: Кури́льские острова́; जपानी: 千島列島) हा प्रशांत महासागरामधील एक द्वीपसमूह आहे. जपानच्या होक्काइदो बेटापासून रशियाच्या कामचत्का द्वीपकल्पापर्यंत १,३०० किमी (८१० मैल) लांबीच्या क्षेत्रामध्ये पसरलेल्या ह्या द्वीपसमूहामध्ये ५६ बेटे असून त्यांचे एकत्रित क्षेत्रफळ १५,६०० चौ. किमी (६,००० चौ. मैल) इतके आहे. २००३ साली येथील लोकसंख्या १६,८०० होती.
राजकीय द्र्ष्ट्या हा द्वीपसमूह रशियाच्या साखालिन ओब्लास्तचा भाग आहे परंतु येथील दक्षिणेकडील दोन मोठ्या बेटांवर जपानने हक्काचा दावा केला आहे.