Jump to content

कुमुदिनी रांगणेकर


कुमुदिनी रांगणेकर - (माहेरच्या कुमुदिनी शंकर प्रभावळकर), (जन्म : २५ मार्च १९०६; - ) या एक मराठी कादंबरीकार व रहस्यकथा लेखिका होत्या. त्यांनी केलेले '``मिल्स ॲन्ड बून' प्रकारातल्या अनेक कादंबऱ्यांचे अनुवाद मराठीतील प्रसिद्ध दिवाळी अंकांतून, आणि 'नवल' मासिकातून दरमहा, १७-१८ वर्षे प्रकाशित होत असत.

श्री. मुसळे ह्या प्रकाशकांनी त्यांच्या अनुवादित कादंबऱ्या प्रकाशित करण्यासाठी मुद्दाम ‘राजेश प्रकाशन’ सुरू केले. त्यांनी कुमुदिनी रांगणेकरांच्या घायाळ हरणी, पत्त्यातली राणी, पाऊलवाटेचं वळण, प्रीतीच्या पंखाविना पाखरू, साद-प्रतिसाद, आदी २० कादंबऱ्या छापल्या.

रांगणेकरांनी काही हिंदी कादंबऱ्यांचेही मराठी अनुवाद केले आहेत.

रांगणेकरबाईंची मख्मली वल्ली ही बालकुमारांसाठीची साहस कादंबरी Baroness Orczy हिने लिहिलेल्या Beau Bracade या कादंबरीचा अनुवाद आहे. 'लांडा कारभार' हा पी.जी. वुडहाऊसच्या कादंबरीचा अनुवाद आहे.

कुमुदिनी रांगणेकर यांची प्रकाशित पुस्तके

  • अंकुरच कुस्करला (कादंबरी)
  • अजब वल्ली (कादंबरी)
  • अडला गाढव (कादंबरी)
  • अंतरीची ओढ (कादंबरी)
  • अतर्क्य गूढ (कादंबरी)
  • अनुबंध (कादंबरी)
  • अ-पूर्व साहित्य (बालसाहित्य)
  • अवचित जमला मेळ (कादंबरी)
  • आग्या वेताळ (कादंबरी)
  • आडवळणी खून (कादंबरी)
  • आव्हान (कादंबरी)
  • इच्छामणी (कादंबरी)
  • एकटी (कादंबरी)
  • एकलीच दीपकळी (कादंबरी)
  • एक होता राजा (कादंबरी)
  • एकाकिनी (कादंबरी)
  • एकांत (कादंबरी)
  • एकेरी गांठ (कादंबरी)
  • कल्पना (कादंबरी)
  • कळेल कां ते तुला? (कादंबरी)
  • काजळरात (कादंबरी)
  • किंमत प्राप्त (कादंबरी)
  • किती चतुर बायका (कादंबरी)
  • कुकर्माचा कर्ता (कादंबरी)
  • कुठे गेला खुनी (कादंबरी)
  • खुपणारा सुखा (कादंबरी)
  • गरुडाची झेप
  • गोड बंधन (कथासंग्रह)
  • घडू नये ते घडले (कादंबरी)
  • घायाळ हरणी (कादंबरी)
  • चकवा (कादंबरी)
  • चमत्कार तर खरंच (कादंबरी)
  • छोट्यांची मोठी साहसे भाग १, ५ (बालसाहित्य)
  • जीवघेणी साथ (कादंबरी)
  • जीवनाचं सर्वस्व (कादंबरी)
  • ढगाळलेले आकाश (कादंबरी)
  • डाॅक्टर ... डाॅक्टर (कादंबरी)
  • ताऱ्यांचा मागोवा (कादंबरी)
  • तिघांच्या साक्षीने खून (कादंबरी)
  • तिघांच्या साक्षीने खून (कादंबरी)
  • तिनं काय पाहिलं (कादंबरी)
  • ते राहू देत स्वप्नी (कादंबरी)
  • जिथे तीन फाटे फुटतात (अनुवादित, मूळ एथेल एम डेल् यांची 'व्हेअर थ्री रोड्स मीट')
  • तिनं काय पाहिलं? (कादंबरी)
  • तुटलेले धागे (कादंबरी)
  • त्या रामप्रहरी (कादंबरी)
  • दारीच्या चिमण्या उडुनी गेल्या (कादंबरी)
  • दिवास्वप्न (कादंबरी)
  • दुरावा (कादंबरी)
  • देखणा बहाणा (कादंबरी)
  • दे दान सुटे ग्रहण (कादंबरी)
  • नजरबंदीचा डाव (कादंबरी)
  • नसत्या उठाठेवी (कादंबरी)
  • नाजुक ठेव (कादंबरी)
  • निद्रिस्त खून (कादंबरी)
  • निनावी पत्रांची साथ (कादंबरी)
  • निरगांठ (कादंबरी)
  • निरागस पोरगी (कादंबरी)
  • निर्माल्यातील कळी (कादंबरी)
  • नियती (कादंबरी)
  • पंचरंगी सामना (कादंबरी)
  • पत्त्यातली राणी (कादंबरी)
  • परतदान (कादंबरी)
  • पाऊलवाटेचं वळण (कादंबरी)
  • पापण्यात मिटले आसू (कादंबरी)
  • पिंगट केसाची तरुणी (कादंबरी)
  • पुनर्जीवन (कादंबरी)
  • पुनवेच्या पहाटे (कादंबरी)
  • पुष्प-पराग
  • प्रीतीची रीतच न्यारी (कादंबरी)
  • प्रीतीचे कोडे (कादंबरी)
  • प्रीतीच्या पंखविना पाखरूं (कादंबरी)
  • प्रेमाचा हुकमी त्रिकोण (कादंबरी)
  • फुललेली कळी (कादंबरी)
  • फोडला काळा पत्थर (कादंबरी)
  • बच्चू लछमन (कादंबरी)
  • बाहुली पडली आजारी (बालसाहित्य)
  • बिनबुडाची समस्या (कादंबरी)
  • बेसुर संगीत (कादंबरी)
  • भाववेडी (कादंबरी)
  • मख्मली वल्ली (बालकुमारांसाठी कादंबरी)
  • मस्त उचापती (कादंबरी)
  • माघार (कादंबरी)
  • मांजरीची जादू (कादंबरी)
  • माझे मला कळेना (कादंबरी)
  • मिटलेल्या पाकळ्या (कादंबरी)
  • मुलखावेगळी (कादंबरी)
  • मूक राही भावना (कादंबरी)
  • मृत इसमाचा आरसा आणि १४ नंबरमधील खून (कादंबरी)
  • मृत्यूची छाया (कादंबरी)
  • मृदुभाव लोचनींचे (कादंबरी)
  • रंगेल राजा (कादंबरी)
  • रस्सीखेंच (कादंबरी)
  • लग्नाविना पत्नी (कादंबरी)
  • लपंडाव (कादंबरी)
  • लहर (कादंबरी)
  • लाजवट लक्षाधीश (कादंबरी)
  • लांडा कारभार (कादंबरी)
  • वाचवा हो वाचवा (कादंबरी)
  • वेडं साहस (कादंबरी)
  • वेडी हरिणी धावे (कादंबरी)
  • व्हावे मीलन (कादंबरी)
  • शकुनी मोहर (कादंबरी)
  • शब्दांच्या पलिकडले (कादंबरी)
  • शेर ताशेरे (कादंबरी)
  • सप्त सुरांची राणी (कादंबरी)
  • सरल्या श्रावणसरी (कादंबरी)
  • संशयित (कादंबरी)
  • साद-पडसाद (कादंबरी)
  • सारंच अनपेक्षित (कादंबरी)
  • सुप्त ज्वाला (कादंबरी)
  • सूर बदलला (कादंबरी)
  • सोन्याची शिडी (कादंबरी)
  • स्त्रियांच्या कुबड्या (कादंबरी)
  • स्मृति अभंग राहिल्या (कादंबरी)
  • स्वप्नातली कळी (कादंबरी)
  • स्वप्नाळू प्रीत (कादंबरी)
  • हरकाम्या (कादंबरी)
  • हरवलेलं गवसलं (कादंबरी)
  • हा खेळ संशयाचा (कादंबरी)
  • हास्यवायू (कादंबरी)
  • हुकमी एक्का (कथासंग्रह)
  • क्षण एक पुरे (कादंबरी)
  • क्षणाचं वैधव्य (कादंबरी)
  • क्षम्य कारवाई (कादंबरी)