कुबान नदी
कुबान नदी Куба́нь | |
---|---|
क्रास्नोदर शहरामधील कुबानचे पात्र | |
कुबान नदीच्या मार्गाचा नकाशा | |
उगम | कॉकासस पर्वतरांग |
मुख | अझोवचा समुद्र |
पाणलोट क्षेत्रामधील देश | रशिया |
लांबी | ८७० किमी (५४० मैल) |
उगम स्थान उंची | १,३३९ मी (४,३९३ फूट) |
सरासरी प्रवाह | ४२५ घन मी/से (१५,००० घन फूट/से) |
पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ | ५७,९०० |
कुबान (रशियन: Куба́нь) ही रशियाच्या कॉकेशस प्रदेशामधील एक प्रमुख नदी आहे. ८७० किमी लांबी असलेली ही नदी एल्ब्रुस पर्वताच्या उतारावर उगम पावते व उत्तर व पश्चिमेकडे वाहत जाऊन अझोवच्या समुद्राला मिळते.
ही नदी रशियाच्या काराचाय-चेर्केशिया, स्ताव्रोपोल क्राय, अदिगेया व क्रास्नोदर क्राय ह्या राजकीय विभागांतून वाहते. क्रास्नोदर हे कुबानवरील सर्वात मोठे शहर तर चेर्केस्क हे एक इतर शहर आहे.
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत