कुतुब मिनार
विटांनी बांधलेली जगातील सर्वात उंच इमारत. | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | minaret | ||
---|---|---|---|
ह्याचा भाग | Qutb complex | ||
याचे नावाने नामकरण | |||
वापरलेली सामग्री |
| ||
स्थान | दिल्ली, National Capital Territory of Delhi, भारत | ||
स्थापत्यशास्त्रातील शैली | |||
वारसा अभिधान |
| ||
महत्वाची घटना |
| ||
उंची |
| ||
अधिकृत संकेतस्थळ | |||
| |||
कुतुब मिनार (उर्दू: قطب منار) ही विटांनी बांधलेली जगातील सर्वात उंच इमारत आहे. हा मिनार भारताच्या दक्षिण दिल्ली शहरातील मेहरोली भागात आहे. हा मिनार पाहायला परदेशातून लोक येत असतात. ही वास्तू युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ घोषित केले आहे.
१३ व्या शतकात कुतुब मिनाराच्या बांधकामास सुरुवात झाली. हा भारतीय कलेचा एक उत्तम नमुना आहे. कुतुब मिनार लाल दगडानी बांधलेला आहे. कुतुबुद्दीन ऐबकाच्या नावावरून त्याला कुतुब मिनार असे संबोधले जाते. कुतुबुद्दीनने आपल्या हयातीच्या काळात मिनारचे बांधकाम केले. पण तो कुतुब मिनारचा फक्त पाया पूर्ण करू शकला. त्याचा ऊत्तराधिकारी इल्तमश याने मिनारचे पुढील बांधकाम पूर्ण केले. एकूण १०० एकर जागेत मिनार व मिनारचा परिसर आहे. मिनारची उंची २३७.८ फूट इतकी आहे. मिनारचा घेर जमिनीलगत १४.३२ मीटर इतका आहे. सर्वात शेवटचा मजला फिरोझ शाह तुघलक ह्याने ईसवी सन १३८६ मध्ये पूर्ण केला. कुतुब मिनार वर सर्व बाजुंनी कुराणातिल वचने आणि अनेक अप्रतिम इस्लामिक शिल्प कोरलेली आहेत.
कुतुब मिनारच्या निर्मितीचा इतिहासही तसा फार रोमांचक असा आहे. दिल्लीवर पृथ्वीराज चव्हाण या हिंदू राजाचे राज्य होते. तो अकरा-बाराव्या शतकाचा काळ होता. त्यानंतर मोहंमद घोरीने स्वारी करून दिल्ली आपल्या ताब्यात घेतली. अवघ्या काही वर्षातच कुतुबुद्दीन ऐबकाने मोहंमद घोरीला पराभूत करून दिल्लीवर आपले साम्राज्य स्थापित केले. कुतुबुद्दीनाने घोरीवर मिळविलेल्या शानदार विजयाचे प्रतिक म्हणून कुतुब मिनार बांधावयास घेतले.
कुतुब मिनार दिल्ली मध्ये स्थित असुन ह्याची ऊंची २३७.८ फूट आहे. विटांपासुन बनलेला हा जगातील सर्वात ऊंच मिनार आहे. ह्याच्या बांधकामाची सुरुवात ईसवी सन ११९३ मध्ये कुतुबुद्दिन ऐबक ह्याने सुरू केली. पण तो कुतुब मिनारचा फक्त पाया पूर्ण करू शकला.त्याचा ऊत्तराधिकारी ईल्तुतमिश ह्याने आणखिन ३ मजले चढविले. सर्वात शेवटचा पाचवा मजला फिरोझ शाह तुघलक ह्याने ईसवी सन १३८६ मध्ये पूर्ण केला. कुतुब मिनार वर सर्व बाजुंनी कुराणातिल वचने कोरलेली आहेत. कुतुब मिनारच्या निर्मिती आधी ह्या परिसरात लाल कोट ही दिल्ली (त्यावेळी धिल्लीका)चे शेवटचे हिंदू राजे तोमर आणि चौहान ह्यांची राजधानी होती. ह्या परिसरात आधी २७ हिंदू आणि जैन मंदिरे होती. ही मंदिरे उध्वस्त करून त्यांच्या दगड - विटांपासुन कुतुब मिनारची निर्मिती केली गेली. कुतुब मिनारावर एका ठिकाणी "श्री विश्वकर्मा प्रसादे रचिता" असे कोरलेले आढळते. आजही ह्या मंदिरांचे भग्नावशेष ह्या परिसरात पहायला मिळतात. कुतुब मिनार ह्या मंदिरांच्या भग्नावशेषांवर आज ऊभा आहे
दुर्घटना
सन १९८१ मध्ये कुतुबमिनार, दिल्ली येथे अचानक विद्युत पुरवठा खंडल्यामुळे अंधार झाला.त्यामुळे झालेल्या धावपळीत ४५ लोकांचा मृत्यू. त्यातच कोणीतरी कुतुबमिनार पडतो आहे अशी ठोकलेली अफवा. यात लहान मुलांची संख्या जास्त होती.[ संदर्भ हवा ]
बाह्य दुवे
- युनेस्कोच्या यादीवर कुतुब मिनार (इंग्रजी मजकूर)