Jump to content

कुणकवण

कुणकवण हे महाराष्ट्राच्या रत्‍नागिरी जिल्ह्यातील गाव आहे. हे गाव राष्ट्रीय महामार्ग ६६ वरील खारेपाटण गावापासून अर्ध्यातासाच्या अंतरावर आहे. कुणकवण व फणसगाव या दोन गावांच्या दरम्यान कोर्ले-सांतडी हे धरण आहे.

गावामध्ये अनेक प्राचीन मंदिरे आहेत. गावचे  ग्रामदैवत श्रीगांगेश्वर आहे. हे गाव महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांचे गाव आहे. गावाकडे येणारे व गावाच्या वाडीतील रस्त्यांचे डांबरीकरण झालेले आहे. येथून जवळ शेंडया डोंगर हा डोंगर आहे.