कुडूस
?कुडूस महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | वाडा |
जिल्हा | पालघर जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | वारली, कुणबी. |
कोड • पिन कोड • दूरध्वनी • आरटीओ कोड | • ४२१३१२ • +०२५२६ • एमएच/४८ /०४ /०५ |
कुडूस हे भारताच्या महाराष्ट्र राज्याच्या उत्तर कोकण भागात येणाऱ्या पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातले एक गाव आहे.
भौगोलिक स्थान
वाडा बस स्थानकापासून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८४८ ने गेल्यावर हे गाव लागते. वाडा बस स्थानकापासून हे गाव १५ किमी अंतरावर आहे.
हवामान
पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.
लोकजीवन
येथे विविध गणपती कारखाने आहेत. त्यामध्ये दरवर्षी १५ ते १७ हजार गणेशमूर्ती साकारल्या जातात. अर्ध्या फुटापासून सात फुटापर्यंत गणेशमूर्ती साकारल्या जातात. ठाणे, पालघर, नाशिक जिल्ह्यातून येथील गणेशमूर्तीना मागणी असते.
नागरी सुविधा
गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस वाडा बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षा सुद्धा वाड्यावरून उपलब्ध असतात.
जवळपासची गावे
जाळे, खैरेआंबिवळी, तोरणाई, चेंदवळी, कुयाळु, वाडा, घिवळी,सावराई, कांबोडे,कुडण, दहिसरतर्फेतारापूर ही जवळपासची गावे आहेत.
संदर्भ
- https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html
- https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html
- https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/
- http://tourism.gov.in/
- http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036
- https://palghar.gov.in/
- https://palghar.gov.in/tourism/