Jump to content

कुंथलगिरी

कुंथलगिरी हे जैन धर्मीयांचे तीर्थक्षेत्र आहे. येथून भगवान कुलभुषण व भगवान देशभुषण हे दोन बंधूनी मोक्षपद प्राप्त केलं. येथे प्रथमाचार्य आचार्य शांतीसागर यांची समाधी आहे. येथे भगवान नेमीनाथ मंदिर व भगवान बाहुबली यांची कायोत्सर्ग मध्ये असलेली प्रतिमा आहे. मध्ययुगीन काळापासून हे अहिंसा क्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. हे क्षेत्र इसवी सन पूर्वापासुन हे धार्मिक क्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. प्राकृत भाषेत ' वसंत्थलवणणियरे पच्छिम भायम्मि कुंथुगिरिसिहरे।कुलदेसभूषणमुणी णिव्वाण गया णमो तेसिं।' असा उल्लेख आढळतो. या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना राहण्याची उत्तम सुविधा या ठिकाणी करण्यात आली आहे .

राष्ट्रीय महामार्ग २११ वर सरमकुंडी फाट्यावरून दोन तीन किमी अंतरावर आहे. देशभरातील पर्यटक या ठिकाणी भेट देण्यासाठी येतात. या ठिकाणी एक माध्यमिक हायस्कूल देखील आहे.आजही या ठिकाणी अनेक विद्यार्थी शिक्षण घेतात सण 2022 मध्ये या शाळेला 50 वर्षे पूर्ण झाली.

अगं बाई अरेच्चा! या चित्रपटातील मुख्य पात्राचे आडनाव कुंथलगिरीकर असे आहे.