कुंजरगड
कुंजरगड | |
कुंजरगडावरील पाण्याची टाकी व अवशेष | |
नाव | कुंजरगड |
उंची | |
प्रकार | गिरिदुर्ग |
चढाईची श्रेणी | सोपी |
ठिकाण | अहमदनगर जिल्हा |
जवळचे गाव | अकोले |
डोंगररांग | हरिश्चंद्राची रांग |
सध्याची अवस्था | व्यवस्थित |
स्थापना | {{{स्थापना}}} |
कुंजरगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. तसेच कुंजरगड हे महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यामधील अकोले तालुक्यातील फोफसंडी गावातील किल्ला आहे. ऑक्टोबर १६७० मध्ये दिंडोरीचे रणक्षेत्र गाजवून राजे कुंजरगडावर आले होते . मराठयांची फौज येथे विश्रांतीसाठी होती.दिंडोरीच्या लढाईतील जखमींची येथे शुश्रूषा केली गेली.
भौगोलिक स्थान
अहमदनगर जिल्ह्यामधील अकोले तालुका हा दुर्ग संपन्न तालुका आहे. या गिरिदुर्गाच्या मधे एक अपरिचित दुर्गरत्न म्हणजे कुंजरगड हे होय. माळशेज घाटापासून सह्याद्रीची एक उपरांग पूर्वेकडे धावते. ही भौगोलिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाची असलेली ही डोंगररांग बालाघाट म्हणून ओळखली जाते. हरिश्चंद्रगडापासून सुरू होणारी ही रांग पूर्वेकडे बीड जिल्ह्यापर्यंत जाते. हीच रांग माळशेज घाट परिसरात पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यांची सीमा विभागते. या रांगेमध्ये हरिश्चंद्रगडाच्या पूर्वेला कुंजरगड किल्ला दिमाखात उभा आहे.
कुंजरगड हा कोंबडा किल्ला या नावानेही ओळखला जातो. कुंजरगडाला जाण्यासाठी दोन तीन मार्ग आहेत. कुंजरगडाच्या जवळ फोफसंडी नावाचे लहानसे गाव आहे. हे गाव डोंगररांगेच्या माथ्यावर असलेल्या पठारी भागात वसलेले आहे.कुंजरगड समोर ठेवल्यास डावीकडे खिंड आहे. या खिंडीमधून विहीर गावाकडे जाणारी पायवाट आहे. कुंजरगडाच्या उजवीकडून गडावर जाणारा पायऱ्यांचा मार्ग आहे.
गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे
कुंजरगडावर शिवाजी राजांनी मुक्काम केल्याची इ.स.१६७० मधील नोंद आहे. गडाची तटबंदी, वाड्याचे अवशेष, पाण्याची टाकी, घरांची जोती असे गडपणाचे अवशेष पहायला मिळतात. गडाच्या माथ्यावरून मुळा नदीचे खोरे विस्तृत दिसते. हरिश्चंद्रगड, कलाड, आजोबा, घनचक्कर, भैरवगड तसेच कळसूबाई रांगही दिसते.पायऱ्या उतरल्यावर तसेच थोडे पुढे गेल्यावर कातळात कोरलेली गुहा लागते. गुहेच्या आतल्या कोपऱ्यात एक सापट तयार झाली आहे. विजेऱ्यांच्या उजेडात सावधगिरीने या सापटीत शिरावे लागते. सुरुवातीला काही अंतर रांगत जाऊन नंतर झोपून डावीकडे वळावे लागते. जमिनीलगत असलेल्या लहान भोकातून डोके आत घालून सर्व शरीर आत ओढून घ्यावे लागते. येथून आत शिरल्यावर पुढे हे भोक मोठे होत जाते. भोकाच्या टोकाला चार पाच जण उभे राहू शकतात. हे भोक कुंजरगडाच्या कड्यावर उघडत असल्याने येथून खालची दरी आणि निसर्ग उत्तम दिसतो.
गडावरील राहायची सोय
गडावर राहण्याची सोय नाही, परंतु तंबू किंवा तत्सम साहित्य नेल्यास मुक्काम करता येतो. ==गडावरील खाण्याची सोय== गडाच्या पायथ्याशी फोफसंडी गावात कोपरे रोडला पिचडवाडी येथे मुठे बंधू यांचे सह्याद्री दर्शन पथिकालय (हाॅटेल) येथे जेवण्याची व राहण्याची सोय आहे.
गडावरील पाण्याची सोय
गडावर पाण्याची टाकी असून हिवाळ्याच्या शेवटपर्यंत पाणी उपलब्ध असते.
गडावर जाण्याच्या वाटा
गडावर जाण्यासाठी दोन प्रमुख वाटा आहे.
- फोफसंडी हे एक दुर्गम गाव आहे. तिथे पुणे-आळेफाटा-ओतूर मार्गे जाता येते. किंवा अकोले- कोतुळ मार्गे जाता येते. या गावापासून उत्तर दिशेला किल्ला आहे. पाऊलवाटेचा उपयोग करून किल्ल्यावर जाता येते.
- अकोले तालुक्यातील कोतुळमार्गे विहीर गावात पोहचून येथील पाऊलवाटेने जाता येते.
मार्ग
जाण्यासाठी लागणारा वेळ
संदर्भ
- सांगाती सह्याद्रीचा - यंग झिंगारो
- डोंगरयात्रा - आनंद पाळंदे
- दुर्गदर्शन - गो. नी. दांडेकर
- किल्ले - गो. नी. दांडेकर
- दुर्गभ्रमणगाथा - गो. नी. दांडेकर
- ट्रेक द सह्याद्रीज (इंग्लिश) - हरीश कापडिया
- सह्याद्री - स. आ. जोगळेकर
- दुर्गकथा - निनाद बेडेकर
- दुर्गवैभव - निनाद बेडेकर
- इतिहास दुर्गांचा - निनाद बेडेकर
- महाराष्ट्रातील दुर्ग - निनाद बेडेकर
- गडसंच - बाबासाहेब पुरंदरे
- किल्ले पाहू या - प्र. के. घाणेकर
- गडदर्शन - प्र. के. घाणेकर
- गड आणि कोट - प्र. के. घाणेकर
- इये महाराष्ट्र देशी - प्र. के. घाणेकर
- चला जरा भटकायला - प्र. के. घाणेकर
- साद सह्याद्रीची, भटकंती किल्ल्यांची - प्र. के. घाणेकर
- सोबत दुर्गांची - प्र. के. घाणेकर
- मैत्री सागरदुर्गांची - प्र. के. घाणेकर
- दुर्गांच्या देशात - प्र. के. घाणेकर
- गड किल्ले गती जयगाथा - प्र. के. घाणेकर
- गडांचा राजा - राजगड - प्र. के. घाणेकर
- ओळख किल्ल्यांची - भाग १ - प्र. के. घाणेकर
- ओळख किल्ल्यांची - भाग २ - प्र. के. घाणेकर
- ओळख किल्ल्यांची - भाग ३ - प्र. के. घाणेकर
- श्रीमान योगी - रणजित देसाई
हे सुद्धा पहा
- भारतातील किल्ले