की अँड का
की अँड का | |
---|---|
दिग्दर्शन | आर. बाल्की |
निर्मिती | आर. बाल्की राकेश झुनझुनवाला |
प्रमुख कलाकार | अर्जुन कपूर करीना कपूर |
संगीत | इळैयराजा |
देश | भारत |
भाषा | हिंदी |
प्रदर्शित | १ एप्रिल २०१६ |
वितरक | इरॉस इंटरनॅशनल |
अवधी | १२३ मिनिटे |
निर्मिती खर्च | ₹३० कोटी |
एकूण उत्पन्न | ₹७५ कोटी |
की अँढ का हा २०१६ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. आर. बाल्कीचे दिग्दर्शन असलेल्या ह्या चित्रपटात अर्जुन कपूर व करीना कपूर ह्यांच्या प्रमुख भूमिका आहेत. की अँड काच्या कथानकामध्ये पती-पत्नीच्या संसारिक जबाबदाऱ्या उलट्या दाखवल्या असून पत्नी करीना कपूर नोकरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करताना तर पती अर्जून कपूर गृहकृत्यदक्ष नवऱ्याच्या भूमिकेत चमकला आहे.
की अँड कामध्ये अमिताभ बच्चन व जया बच्चन हे पाहुणे कलाकार म्हणून झळकले आहेत. तिकीट खिडकीवर की अँड काला प्रेक्षकांचा माफक प्रतिसाद मिळाला.
बाह्य दुवे
- इंटरनेट मुव्ही डेटाबेस वरील की अँड का चे पान (इंग्लिश मजकूर)