किश्तवाड हत्याकांड (२००१)
साचा:Infobox civilian attack
२००१ किश्तवाड हत्याकांड म्हणजे जम्मू-काश्मीरच्या डोडा जिल्ह्यातील किश्तवार जवळील लाडर गावात १७ हिंदू ग्रामस्थांची हत्या ३ ऑगस्ट २००१ला लष्कर-ए-तैयबाच्या कथित दहशतवाद्यांनी केली होती. [१] [२]
हल्ला
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १० अतिरेक्यांचा गट गावात घुसला आणि त्यांनी हिंदू समाजातील २० पुरुषांना घराबाहेर काढले. त्यांच्यावर लगतच्या खडकाळ पर्वताच्या पट्ट्यात नेऊन गोळीबार केला गेला . पाच गावकरी जखमी झाले.
परिणाम
भारतीय संसदेत या हत्येची चर्चा करत विपक्षाने सरकारवर टीका केली. [३] लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादी मुजीब-उर-रहमान याला ३ दिवसानंतर गोळ्या घालून ठार मारण्यात आले. त्यांच्या लॉगबुकवर ३ ऑगस्ट रोजीची नोंद होती, “लष्कर-तोयबाच्या योद्धांनी १९ अविश्वासू लोकांना ठार मारले. हे भारत सरकारसमोर आपले आव्हान आहे. " [४] त्याच्या निषेधार्थ दुसऱ्या दिवशी जम्मूमध्ये पूर्ण बंद पाळण्यात आला. किश्तवार हत्याकांडाच्या विरोधात निदर्शने करणाऱ्यांच्या टोळक्यांनी जम्मू, कठुआ आणि उधमपूर येथे जनरल परवेझ मुशर्रफ यांचे पाकिस्तानी झेंडे आणि पुतळे जाळले. [५]
संदर्भ
- ^ "Ultras massacre 17 in Doda". The Tribune. 5 August 2001.
- ^ "Militants massacre 15 Hindu villagers in Doda". Rediff. 4 August 2001.
- ^ "Doda killings find echo in Parliament". The Hindu. 1 August 2001. 2005-05-24 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-12-21 रोजी पाहिले.
- ^ Swami, Praveen (18 August 2001). "DISTURBED DODA". Frontline. 18 (17). 8 September 2001 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
- ^ Kak, M.L. (6 August 2001). "Complete bandh in Jammu areas". The Tribune.