Jump to content

किझील लेणी

मुजात नदीच्या काठावर तंग घाटाच्या की डोंगरात कोरलेल्या किझील लेणी

किझील लेणी (इंग्रजी: Kizil Caves) चीनी सरकारच्या नियंत्रणाखालील शिंच्यांग प्रांतातील एक बौद्ध लेणींचा समूह आहे जेथे प्राचीनकाळातील तारीम द्रोणीत तुषारी लोकांच्या आणि बौद्ध धर्माच्या संबंधित चित्र, मूर्ती, लेखन व अन्य पुरातन वस्तू मिळाल्या आहेत.[][] ह्या लेणी शिंच्यांग प्रांताच्या आक्सू विभागाच्या बाईचेंग जिल्हामध्ये मुजात नदीच्या उत्तर काठावर कूचा पासून ६५ कि.मी. दूर स्थित आहे. हा प्रदेश ऐतिहासिक रेशिम मार्गावर स्थित होता आणि इसवी सनाच्या तिसऱ्या ते आठव्या शतकादरम्यान विकसित झाला.[]

चित्र

हे सुद्धा पहा

  • कूचा राज्य
  • तुषारी लोग

संदर्भ

  1. ^ Manko Namba Walter (October, 1998). "Tokharian Buddhism in Kucha: Buddhism of Indo-European Centum Speakers in Chinese Turkestan before the 10th Century C.E". Sino-Platonic Papers (85).
  2. ^ "Kezil Thousand-Buddha Grottoes". xinjiang.gov. Archived from the original on 2007-09-30. Retrieved 2007-08-05.
  3. ^ Daniel C. Waugh. "Kucha and the Kizil Caves". Silk Road Seattle. University of Washington.