Jump to content

कासाखुर्द

  ?कासा खुर्द

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळभाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ०.३४८ चौ. किमी
जवळचे शहरडहाणू
जिल्हापालघर जिल्हा
लोकसंख्या
घनता
१,८७२ (२०११)
• ५,३७९/किमी
भाषामराठी
सरपंच /उपसरपंच/हरेश शिवराम मुकणे[]
बोलीभाषावारली,कुुणबी,वाडवळी.
कोड
पिन कोड
दूरध्वनी
• आरटीओ कोड

• ४०१६०७
• +०२५२८
• एमएच/४८ /०४

कासा खुर्द हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील एक गाव आहे.

भौगोलिक स्थान

डहाणू बस स्थानकापासून जव्हार मार्गाने गेल्यावर 'बी.के.आटो कंसल्टंट' नंतर हे गाव लागते. डहाणू बस स्थानकापासून हे गाव २७ किमी अंतरावर आहे.

हवामान

पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.पावसाळ्यात येथे भातशेती,नागलीशेती केली जाते.

लोकजीवन

हे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ३७८ कुटुंबे राहतात. एकूण १८७२ लोकसंख्येपैकी १०२१ पुरुष तर ८५१ महिला आहेत. गावाची साक्षरता ७७.५४ टक्के आहे.पुरुष साक्षरता ८४.९४ आहे तर स्त्री साक्षरता ६९.१३ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या २५१ आहे. ती एकूण लोकसंख्येच्या १३.४१ टक्के आहे. वाडवळ, भंडारी, आगरी, आणि आदिवासी समाजातील लोक येथे राहतात. येथे शेती हा व्यवसाय असून काही लोक शेतमजूर, वीटभट्टीमजूर, खाजगी, सरकारी नोकर, कामगार म्हणूनही काम करतात. दुग्धव्यवसाय, बकरीपालन, कुक्कुटपालन सुद्धा केले जाते.

नागरी सुविधा

गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस डहाणू बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षा सुद्धा डहाणूवरून उपलब्ध असतात.

जवळपासची गावे

रानशेत,चारोटी, वाघाडी, सूर्यानगर, वारोटी, भिसेनगर, सारणी,निकाणे, रानकोळ, दाभोण, आंबिस्ते ही जवळपासची गावे आहेत.कासा समूह ग्रामपंचायतीमध्ये भारड, भिसेनगर,घोळ, कासा खुर्द ही गावे येतात.

संदर्भ

१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html

२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html

३. https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/

४. http://tourism.gov.in/

५. http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036

६. https://palghar.gov.in/

७. https://palghar.gov.in/tourism/

  1. ^ महाराष्ट्र टाईम्स,२३ मे २०२४