काश्गर
काश्गर 喀什市 قەشقەر | |
चीनमधील शहर | |
काश्गर | |
देश | चीन |
प्रांत | शिंच्यांग |
क्षेत्रफळ | १,०५६.८ चौ. किमी (४०८.० चौ. मैल) |
समुद्रसपाटीपासुन उंची | ४,१७० फूट (१,२७० मी) |
लोकसंख्या (२०१९) | |
- शहर | ७,११,३०० |
प्रमाणवेळ | यूटीसी+०८:०० (चिनी प्रमाणवेळ) |
http://www.xjks.gov.cn/ |
काश्गर (किंवा काशी; उय्गुर: قەشقەر) हे चीन देशाच्या वायव्य भागातील शिंच्यांग ह्या स्वायत्त प्रांतामधील एक शहर आहे. चीनमधील सर्वात पश्चिमेकडे मध्य आशियामध्ये स्थित असलेल्या ह्या शहरापासून अफगाणिस्तान, किर्गिझस्तान, ताजिकिस्तान व पाकिस्तान ह्या देशांच्या सीमा लागून आहेत. अश्मयुगीन काळापासून रेशीम मार्गावरील एक महत्त्वाचे ठिकाण राहिलेले काश्गर जगातील सर्वात प्राचीन शहरांपैकी एक ओळखले जाते. चीनला पाकिस्तानसोबत जोडणारा काराकोरम महामार्ग देखील येथेच संपतो. सुमारे ७ लाख लोकसंख्या असलेले काश्गर शहर ह्याच नावाच्या प्रांताचे मुख्यालय आहे. येथील ८१ टक्के रहिवासी मुस्लिम तर उर्वरित १९ टक्के हान चिनी आहेत. येथील इदगाह मशीद ही चीनमधील सर्वात मोठी मशीद आहे.
हे सुद्धा पहा
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
विकिव्हॉयेज वरील काश्गर पर्यटन गाईड (इंग्रजी)