Jump to content

काशीविश्वेश्वर देवस्थान (जेऊर)

फोटो
मूर्ति
विहीर.
नक्षीकाम
मुर्ती

सुक्षेत्र जेऊर (जीनानगर) या गावातील ग्रामदैवत श्री काशीविश्वेश्वर प्राचीन काळी जेऊर गावात पृथ्वीच्या गर्भातून निरंतर गंगाजल उगम पावले आहे. ज्योतिर्लिंगापैकी श्री क्षेत्र काशी येथील श्री काशी विश्वनाथ यांचे प्रतिक म्हणून दक्षिण भारतातील जेऊर येथे साक्षात श्री काशी विश्वनाथ हेच स्वयंभू लिंगाच्या रूपात दर्शन दिलेले आहेत त्यामुळे जेऊर गाव हे दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध झालेले आहे.

दरवर्षी एक साधू काशी यात्रा करत असे एकदा काशी क्षेत्रातील पावन नदी गंगेत स्नान करत असताना त्याचा हातातील सोन्याचे कडे गंगाजलात हरवले.त्याने त्याचा खूप शोध घेतला पण कडे मात्र सापडले नाही त्याने कड्याबाबत चौकशी केली असता एका साधुनी त्यांना सुचवले कि, भारतातील दक्षिणेकडे प्रवास कर तुला एक अद्भूत लिंगाचे दर्शन घडेल त्या लिंगाभोवती पाण्याचे वलय असलेले तुला दिसेल त्या पाण्यात तुला तुझे गंगेत हरवलेले सोन्याचे कडे भेटेल. त्या लिंगाभोवती जे पाण्याचे वलय आहे ते साधारण नसून साक्षात पवित्र गंगा मातेचेच पाणी आहे असे त्यांनी सांगितले हे सर्व ऐकून तो दक्षिणेकडे प्रवासाला निघाला दक्षिणेकडील सर्व शिवलिंगाचे दर्शन घेत घेत तो एके दिवशी जेऊर (जीनानगर) येथील धनगर वाड्यातील एका झाडाखाली विश्राम करत असताना अद्भुत आवाजाने त्याला जाग आली तो जिज्ञासू वृतीने न्याहाळू लागला तेंव्हा त्याला त्या ठिकाणी वाळू, शंख,शिंपले व दुधासारखे पाणी दिसून आले तो आश्चर्याने पाहू लागला तेंव्हा त्याला तिथे एक अद्भुत शिवलिंगाचे दर्शन झाले.(तेंव्हा त्याला काशीस्तित साधूचे कथन आठवले) त्या लिंगाभोवती असलेल्या पाण्यात तो हात फिरवून तीर्थ प्राशन करू लागला आणि काय आश्चर्य त्या लिंगाभोवती असलेल्या पाण्यात त्याला काशी (वाराणसी) येथे गंगेच्या अपवित्र पाण्यात हरवलेले त्याचे सोन्याचे कडे सापडले तेंव्हा तो साधू महाराज जेऊर ग्रामस्थांना या लिंगाची माहिती सांगू लागला तेंव्हापासून आजतागायत प्रत्येक श्रावण मासातील तिसऱ्या सोमवारी प्रत्यक्ष गंगामाता अवतरीत होते त्यावेळी मंदिराच्या गाभाऱ्यात शंख,शिंपले,वाळू,दुधासारखे पाणी लिंगातून बाहेर येते.

तसेच प्रती चैत्र शुद्ध प्रतिपदे दिवशी सुर्यानारायाण महाद्वारातील खिडकीतून श्री काशीविश्वेश्वराचे दर्शन आपल्या किरण स्पर्शाने घडते. मंदिराच्या ईश्यान्येकडील प्राचीन व सुबक विहिरीतील जोडलिंग हे शिव-पार्वतीचे प्रतिक म्हणून पूजले जाते. चित्रदालन: