Jump to content

काव्या मारन

Kavya Maran (en); काव्या मारन (mr); కావ్య మారన్ (te) तमिळ उद्योगपती (mr)
काव्या मारन 
तमिळ उद्योगपती
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
जन्म तारीखऑगस्ट ६, इ.स. १९९२
व्यवसाय
  • व्यावसायीक व्यक्ती
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

काव्या मारन (जन्म:१ नोव्हेंबर, १९९१ - हयात) ह्या एक भारतीय उद्योगपती असून त्या इंडियन प्रीमियर लीग[] मधील सनरायझर्स हैदराबाद आणि SA20 लीगमधील 'सनरायझर्स इस्टर्न केप' च्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सह-मालक आहेत.[] सन ग्रुपच्या अध्यक्ष आणि संस्थापक कलानिधी मारन यांच्या त्या कन्या आहेत.[][]

प्रारंभिक जीवन

मारन यांचा जन्म चेन्नईमध्ये कलानिधी मारन आणि कावेरी कलानिधी या जोडप्याच्या पोटी ६ ऑगस्ट १९९२ रोजी झाला. त्यांनी २०१२ मध्ये चेन्नईच्या स्टेला मॅरिस कॉलेजमधून वाणिज्य शाखेतील पदवी प्राप्त केली. नंतर २०१६ मध्ये त्यांनी न्यू यॉर्क युनिव्हर्सिटी स्टर्न स्कूल ऑफ बिझनेस मधून मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन (एमबीए) पदवी प्राप्त केली.[]

कारकीर्द

मारन आपल्या वडिलांनी स्थापन्न केलेल्या सन ग्रुपमध्ये सामील झाल्या. सन नेटवर्क ही आशियातील सर्वात मोठ्या मीडिया नेटवर्कपैकी एक आहे.[] सन ग्रुपच्या छत्राखालील इतर एफएम चॅनेल, सन टीव्ही नेटवर्क आणि सन म्युझिक[] मध्ये काम करून त्यांनी आपल्या व्यावसायिक प्रवासाला सुरुवात केली.

२०१८ मध्ये, सन ग्रुपच्या मालकीच्या इंडियन प्रीमियर लीग मधील क्रिकेट संघ,[] सनरायझर्स हैदराबादच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. मारन यांच्या नेतृत्वाखाली सदरील संघाने लीगमध्ये बऱ्यापैकी कामगिरी बजावली.[]

पुरस्कार

जानेवारी २०२४ मध्ये, काव्याला फ्रेंचाइजीमधील त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल देवी अवॉर्ड्समध्ये 'फेस अँड फोर्स बिहाइंड सनरायझर्स हैदराबाद' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले,[][]

एकूण संपत्ती

मारन यांची एकूण संपत्ती जवळपास $५० दशलक्ष[१०] (अंदाजे ₹४०९ कोटी) इतकी असल्याचा अंदाज आहे, ज्यामुळे त्या भारतातील सर्वात श्रीमंत तरुण व्यावसायिक महिलांपैकी एक बनल्या आहेत.[११]

संदर्भ

  1. ^ "Meet Kavya Maran, the Sunrisers Hyderabad CEO Making Waves in IPL Season; all about her Network and Business". Times Now Digital. 16 April 2024 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 16 April 2016 रोजी पाहिले.
  2. ^ "Who Is Kavya Maran? The CEO Of Sunrisers Hyderabad". One India. 19 December 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 19 December 2023 रोजी पाहिले.
  3. ^ "All you need to know about SunRisers Hyderabad CEO amid IPL Auction 2024". mint. 19 December 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 19 December 2023 रोजी पाहिले.
  4. ^ "IPL Auction 2024: Meet Kavya Maran, the CEO of SunRisers Hyderabad". mint. 19 December 2023. 26 April 2024 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 20 May 2024 रोजी पाहिले.
  5. ^ "SRH CEO Kavya Maran's Education, Net Worth". India.com (इंग्रजी भाषेत). 2024-04-25. 14 May 2024 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2024-05-22 रोजी पाहिले.
  6. ^ a b c "Sun TV Network inducts Kaviya Maran to its Board; names R Mahesh Kumar as Managing Director" (इंग्रजी भाषेत). 2019-03-22. 1 May 2024 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2024-05-01 रोजी पाहिले.
  7. ^ "लंदन से MBA कर लौटी बेटी काव्या मारन, पापा ने थमा दी 2-2 क्रिकेट टीमें, एक चैंपियन तो दूसरी रनरअप". hindi.news18.com (हिंदी भाषेत). ३० मे २०२४ रोजी पाहिले.
  8. ^ S, Praveen Kumar (2024-01-26). "Devi Awards 2024: Of women, grit, grace and glory". Indulgexpress (इंग्रजी भाषेत). 1 May 2024 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2024-05-01 रोजी पाहिले.
  9. ^ Kumar, Praveen (2024-01-25). "Devi Awards 2024: Of women, grit and glory". The New Indian Express (इंग्रजी भाषेत). 2 May 2024 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2024-05-01 रोजी पाहिले.
  10. ^ "Exploring the impressive net worth of SunRisers Hyderabad co-owner, Kavya Maran". Financialexpress (इंग्रजी भाषेत). 2023-12-22. 26 May 2024 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2024-05-01 रोजी पाहिले.
  11. ^ Livemint (2023-12-19). "IPL Auction 2024: Meet Kavya Maran, the CEO of SunRisers Hyderabad". mint (इंग्रजी भाषेत). 26 April 2024 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2024-05-01 रोजी पाहिले.