Jump to content

कावड

झारखंड राज्यातील वासुकिनाथ मंदिराच्या अभिषेकासाठी निघालेली कावड.

कावड[ चित्र हवे ] हे पाण्याच्या दोन घागरी अथवा दोन जड पदार्थ इकडून तिकडे नेण्यासाठी बांबूच्या दोन टोकांना दोऱ्या बांधून त्याखाली वाहून न्यायच्या वस्तू ठेवलेली शिंकाळी असलेले पारंपरिक भारतीय साधन होय.[] घरोघरी कावडीने पाणी भरून उदर निर्वाह करणाऱ्यांना पाणक्या अथवा पाणेरी म्हणत [ दुजोरा हवा]. शिवाजी महाराज कालीन मराठीत कावड या शब्दासाठी 'आडे' आणि कावड वाहून नेणाऱ्या व्यक्तीस 'आडेकरी' हे शब्द वापरात असावेत. धुण्डिराज व्यासकृत, शिवाजी महाराजांनी बनवून घेतलेल्या राजकोशात धुण्डिराज व्यासांनी 'तुला' आणि 'तुलावाहः' हे पर्यायी शब्द सुचवलेले दिसतात.[]

कावड यात्रा

हरिद्वार येथील हर की पौरी येथे कावड घेऊन पोहोचलेल्या भक्तांचा मेळावा

कावड यात्रेचे हिंदी भाषेतील पर्यायी उच्चारण 'कॉंवर यात्रा' असेही आहे. रामायणातील एका कथेत श्रावण नावाचा एक तरुण आपल्या वृद्ध आईवडिलांना कावडीत बसवून काशी यात्रेस नेतो असा उल्लेख येतो. संत एकनाथांनी देवाच्या अभिषेकासाठी काशीहून कावडीने आणलेले पाणी तहानेने व्याकुळलेल्या गाढवास पिण्यास देऊन भूतदयेचा आदर्श घालून दिला अशी हकीकत आहे..[]

संत एकनाथांच्या एका अभंगातून कावड यात्रेचा उल्लेख येतो[],

"ज्ञान वैराग्य कावडी खांदी| शांती जीवन तयामधी॥ शिवनाम तुम्ही घ्या रे। शिवस्मरणी तुम्ही रहा रे॥ हरिहर कावड घेतली खांदी। भोवती गर्जती संतमांदी॥ एका जनार्दनी कावड बरी। भक्ती फरारा तयावरी॥"

भारतात शिवमंदिरे असलेल्या काही ठिकाणी कावडीने पाणी आणून शिवलिंगास अभिषेक करण्याचे उत्सव साजरे केले जातात.[] महाराष्ट्रात शंकरेश्वर मंदिर - कोदवली (राजापूर); शिखर शिंगणापूर; राजराजेश्वर मंदिर - अकोला; भैरवनाथ मंदिर मौजे कंडारी तालुका परांडा जिल्हा उस्मानाबाद[] ; संत सोहमनाथ महाराज मंदिर श्रीक्षेत्र आसोला खु. मानोरा[]; या ठिकाणी कावड उत्सव साजरे केले जातात. भारतातील मध्य प्रदेशात देवझिरी तीर्थ झाबुआ[], व महाकालेश्वर मन्दिर उज्जैन येथे तर उत्तरांचल प्रदेशात हरिद्वार येथे, राजस्थानात मंगलेश्वर महादेव मंदिर जयपूर[]; देवघर मंदिर झारखंड[१०]; देवघरचे (झारखंड) बैजनाथ मंदिरासाठी सुल्तान गंज ते देवघर येथे कावड यात्रा साजरी केली जाते.

गंगा नदीचे पाण्याची कावडीने नेऊन रामेश्वरला अभिषेक करण्याचीही परंपरा होती.[११][१२] गंगेचे पाणी इच्छितस्थळी पोहोचवणाऱ्या कावड विषयक परंपरांना अहल्याबाई होळकरांनी आश्रय दिला होता.[१३] वर्षभरातून एखाद कोटी लोक उत्तराखंड राज्यातील. हरिद्वार येथील गंगेचे पाणी जलाभिषेकासाठी कावडीने घेऊन जातात. [१४][१५]

अकोल्यापासून १८ किलोमीटर अंतरावरील ग्रांधीग्राम येथे पूर्णा नदीच्या पाण्याने कावड भरून ती श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारी अकोला येथे राजराजेश्वर मंदिरास आणतात. या कावडीच्या पाण्याने देवास जलाभिषेक करण्यास १९४४ साली सुरुवात झाली. काळाच्या ओघात या कावड परंपरेचे पालखी महोत्सवात रूपांतरण झाले. ३००हून आधिक कावड मंडळांच्या १३७हून अधिक पालख्या या शोभायात्रेत सहभागी होतात.[१६] अकोल्याच्या पालखी शोभा यात्रेत, ढोल ताशे, बॅॅंजो बॅंड पार्ट्या आणि डीजेच्या तालावर तरुण नाचही करतात.[१७]

कोदवली (राजापूर) येथे शिमगोत्सवात आणि त्रिपुरी पौर्णिमेला शंकरेश्वराच्या पालखीसोबत कावडही सजवली आणि घरोघरी फिरवली जाते. विशिष्ट पेहरावातील खेळे पालखीबरोबरच कावडही वाद्यांच्या विशिष्ट ठेक्यांवर नाचवतात. देवाची कावड नवसाला पावते असे समजून श्रद्धेने नवसही बोलले जातात.[१८] कावड नाचवण्याची प्रथा उस्मानाबाद जिल्ह्यातील मौजे करांडा येथे भैरवनाथ मंदिराच्या कावड सोहळ्यात सुद्धा दृष्टोत्पत्तीस पडते.[१९]

चैत्र शुद्ध द्वादशीस शिखर शिंगणापूर येथील डोंगरावर मुंगीघाटातून कावडीने पाणी आणतात व महादेवाला अभिषेक करतात.

नर्मदा काठच्या कोटेश्वर महादेव येथून १५० किलोमीटर अंतरावरील झाबुआ येथील देवझिरी तीर्थ येथील शिवमंदिरासाठी कावड यात्रा काढून जलाभिषेक केला जातो.[२०]

अश्वलिंग मंदिर, पिंपळवंडी ता पाटोदा जिल्हा बीड येथे अश्वलिंग संस्थानवर ऐतिहासिक शिवमंदीर प्रसिद्ध आहे. तेथेही पैठणच्या गोदावरी नदीवरून कावडी आणून महादेवाचा जलाभिषेक केला जातो...

कलश यात्रा

अजमेर येथे नवरात्र महोत्सवाच्या काळात पुष्कर ते अजमेर कावडयात्रा काढली जाते आणि महिला पाण्याचे कलश घेऊन यात्रेत सहभागी होतात.[२१]

संदर्भ

  1. ^ http://www.cfilt.iitb.ac.in/wordnet/webmwn/wn.php
  2. ^ [गूगल बुक्स राजकोश] Check |दुवा= value (सहाय्य) (मराठी, संस्कृत, and दखनी भाषेत). p. ९२. ३१, जुलै २०१५ रोजी पाहिले. (पुस्तकातील विशिष्ट वाक्य, ज्याचा संदर्भ घेतला आहे) |पहिलेनाव= missing |पहिलेनाव= (सहाय्य); |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  3. ^ http://marathi.webdunia.com/article/hinduism-marathi/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%AE-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE-110060800003_1.htm
  4. ^ "संग्रहित प्रत". 2016-03-07 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2015-07-30 रोजी पाहिले.
  5. ^ http://prahaar.in/maharashtra/kokanachamewa/340712 Archived 2015-08-13 at the Wayback Machine. या दुव्याची वेबॅक मशिनवरील आवृत्ती (संदर्भित दुव्यात त्रुटी जाणवल्याने वेबॅक मशिन वापरुन ही आवृत्ती मिळवलेली आहे.)
  6. ^ "संग्रहित प्रत". 2015-02-20 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2015-07-30 रोजी पाहिले.
  7. ^ http://www.lokmat.com/storypage.php?catid=322&newsid=1880415
  8. ^ http://www.newsrelic.com/2014/07/blog-post_95.html
  9. ^ http://mahanagartimes.net/%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5-%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A1/
  10. ^ http://www.aapkafaisla.in/2014/07/29/%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%A1%E0%A4%BC%E0%A4%95-%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%82-12-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A1/[permanent dead link]
  11. ^ http://ketkardnyankosh.com/index.php/2012-09-06-10-40-02/479-2012-10-07-12-56-40
  12. ^ http://www.transliteral.org/dictionary/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A1-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A3%E0%A5%87%E0%A4%82/word
  13. ^ https://www.rashtrasevikasamiti.org%2FPages%2FAhilyabai.aspx&ei=wHq6VbTeJo7huQTTjLiwBg&usg=AFQjCNHmoX5JUmWulXrrQ6owfENmVt559g&bvm=bv.99028883,d.c2E
  14. ^ http://www.khaskhabar.com/hindi-news/National-one-crore-kavadias-reach-haridwar-22522336.html
  15. ^ http://www.samaylive.com/regional-news-in-hindi/uttarakhand-news-in-hindi/157174/uttarakhand-kavad-trip-from-july-police-and-administrative-offic.html
  16. ^ "संग्रहित प्रत". 2015-10-31 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2015-07-30 रोजी पाहिले.
  17. ^ दैनिक लोकमत वृत्त: 'कावड उत्सवात शिवभक्तांची मांदियाळी- First Published :26-August-2014 : 21:56:59; ३० जुलै २०१५ रोजी रात्रौ २३ वाजून १५ मिनिटांनी जसे पाहिले
  18. ^ "संग्रहित प्रत". 2015-08-13 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2015-07-30 रोजी पाहिले.
  19. ^ "संग्रहित प्रत". 2015-02-20 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2015-07-30 रोजी पाहिले.
  20. ^ http://jhabuanews.ashanews.com/2012/09/Deojhiri-JHABUA-A-Famous-Religious-Place.html
  21. ^ www.ajmernama.com/ajmer/96541/+&cd=136&hl=en&ct=clnk&gl=in