काळा तांदूळ
काळा तांदूळ हा तांदळाचा एक प्रकार आहे. यात तंतुमय पदार्थ (फायबर), तसेच लोह व तांबे ह्या घटकांची मात्रा नेहमीच्या तांदुळापेक्षा अधिक असते. तसेच, उच्च गुणवत्तेचे वनस्पती प्रथिन असते. यात ॲंटिऑक्सिडंटची मात्राही अधिक असते. हा शिजविल्यानंतर गडद जांभळ्या रंगाचा भात होतो.[१]
फिलिपाईन्समध्ये व इंडोनेशियात याची लागवड होते. [२]
उत्पादन
या प्रकारच्या तांदुळाची लागवड पूर्वी चीनमधील राजघराण्यातल्या लोकांसाठी करण्यात येत असे. सामान्य चिनी माणसांना हा लावण्याची परवानगी नव्हती. यामुळे यास 'फॉरबिडन राईस' असे म्हणत असत. याच्या वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्मामुळे याचा अनेक देशात प्रसार झाला. यात संशोधनानंतर, अनेक औषधी गुणधर्म आढळले आहेत.[३]
भारत
भारतात हा तांदूळ ईशान्येकडील राज्यांत विशेषतः मणिपूर येथे पिकविण्यात येतो. तसेच विदर्भातही याची लागवड सुरू झाली आहे.
पहा : सोनरंगी तांदूळ ; तांदूळ
संदर्भ
- ^ लोकसत्ता "काळ्या तांदळाची प्रजाती कर्करोगावर गुणकारी" Check
|दुवा=
value (सहाय्य). २४-१०-२०१८ रोजी पाहिले.|अॅक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ माझापेपर "आहारासाठी अतिउपयुक्त काळा तांदूळ" Check
|दुवा=
value (सहाय्य). २४-१०-२०१८ रोजी पाहिले.|अॅक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ माझापेपर "आहारासाठी अतिउपयुक्त काळा तांदूळ" Check
|दुवा=
value (सहाय्य). २४-१०-२०१८ रोजी पाहिले.|अॅक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
बाह्य दुवे
- काळा तांदूळ म्हणजे काय? (इंग्रजी मजकूर) Archived 2018-10-03 at the Wayback Machine.
- काळ्या तांदुळाबद्दल माहिती (इंग्रजी मजकूर)