कार्ल विल्हेम शील
डिसेंबर ९ १७४२ मध्ये जन्मलेले कार्ल विल्हेम शील हे जर्मन-स्वीडिश रसायनशास्त्रज्ञ होते. त्यांनी रसायनशास्त्रात अनेक महत्त्वाचे शोध लावूनही त्यांचे जनकत्व शील यांना देण्यात येत नाही म्हणून आयझॅक असिमोव्ह हे शील यांना दुर्दैवी शील असे म्हणत. उदा. कार्ल विल्हेम शील यांनी जोसेफ प्रिस्टली यांच्या आधी ऑक्सिजनचा शोध लावला पण जोसेफ प्रिस्टली यांनी आपल्या शोधाची माहिती शील यांच्या आधी प्रकाशित केली तसेच शील यांनी मॉलिब्डेनम आणि (१७७८) आणि क्लोरिनचा शोध हम्फ्री डेव्ही यांच्या आधी लावला. शिवाय बेरियम (१७७४), मॅंगेनिझ (१७७४), टंग्स्टन (१७८१) आणि अनेक मूलद्रव्ये, धातू, रसायने यांच्या शोधाचे/जनकत्वचे श्रेय कार्ल शील यांना मिळावे की नाही यावरही बरेच वाद होते.