कार्मेल बर्कसन
American sculptor | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | इ.स. १९२४ न्यू यॉर्क | ||
---|---|---|---|
नागरिकत्व | |||
शिक्षण घेतलेली संस्था |
| ||
व्यवसाय |
| ||
पुरस्कार |
| ||
| |||
कार्मेल बर्कसन (इ.स. १९२४:न्यू यॉर्क, अमेरिका) या अमेरिकन शिल्पकार आहेत. यांनी भारतीय शिल्पकला आणि स्थापत्यकलेवर संशोधन करून अनेक पुस्तके लिहिली आहेत.
बर्कसन यांनी ड्यूक युनिव्हर्सिटीतून इतिहास विषयात पदवी मिळवली व नंतर त्या कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये मिल्टन हेबाल्ड यांच्या मार्गदर्शनाखाली शिल्पकला शिकल्या. बावीस वर्षे शिल्पे निर्माण केल्यावर बर्कसन १९७०मध्ये भारतात पर्यटनासाठी आल्या. त्यावेळी त्या एलिफंटा, वेरुळ आणि महाबलिपुरम येथील शिल्पकृती पाहण्यासाठी गेल्या. प्राचीन भारतीय शिल्पकलेने त्या प्रभावित झाल्या. त्यानंतर त्यांनी भारतास वारंवार भेटी दिल्या व तेथील शिल्पकला आणि स्थापत्यकलेच्या स्थळांना गेल्या. १९७७मध्ये त्या भारतात वास्तव्यास आल्या व भारतीय शिल्पकलेच्या अनुषंगाने भारतीय तत्त्वज्ञान, पुराणे आणि कलाशास्त्राचा अभ्यास करण्यास सुरुवात केली. त्यांनी काढलेल्या भारतीय शिल्पांच्या छायाचित्रांचा एक संग्रह न्यू यॉर्कच्या मेट्रोपॉलिटन संग्रहालयात आहे. २००१मध्ये त्यांनी पुन्हा एकदा शिल्पे निर्माण करण्यास सुरुवात केली. त्यांची यानंतरची शिल्पे मुख्यतः भारतीय पुराणांतील व्यक्तिरेखांवर आधारित आहेत. याशिवाय त्यांनी बौद्ध आणि ख्रिश्चन धर्मग्रंथातील व्यक्तिरेखांचीही शिल्पे साकारली आहेत.
बर्कसन यांनी भारतीय कलेवर अनेक पुस्तकेही लिहिली आहेत.
भारतीय शासनाने बर्कसन यांना २०१०मध्ये पद्मश्री पुरस्कार दिला. त्यानंतर त्यांनी आपली ३८ शिल्पे मुंबईतील नॅशनल गॅलेरी ऑफ मॉडर्न आर्टला भेट दिल्या व आपण निवृत्त होउन अमेरिकेस परतत असल्याचे जाहीर केले.
बर्कसननी त्यांचा कॉलेजमधील वर्गमित्र मार्टिन फ्लाइशर यांच्याशी लग्न केले आहे.