कारधा पूल (भंडारा)
महाराष्ट्र राज्यातील भंडारा शहरालगत राष्ट्रीय महामार्ग ५३ ला समांतर असलेला वैनगंगा नदीवरील लहान पूल ब्रिटिशांनी १९२९ मध्ये बांधला होता. या पुलाची वयोमर्यादा संपत आल्याने त्याच्या बाजूलाच नवीन पूल बांधण्यात आला. सध्या राष्ट्रीय महामार्ग ५३ वरील जड वाहतूक नवीन पुलावरून सुरू आहे. अजूनही जुना पूल मात्र वाहतुकीस सुरू आहे. सध्या या पुलावरून जड वाहतूक बंद असली; तरी पादचारी व दुचाकींची वाहतूक सुरू आहे. ब्रिटिशांच्या काळात बांधलेला हा दगडी पूल अगदी अरुंद आहे. गोसीखुर्द धरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर पाण्याची पातळी पुलापर्यंत राहते. पावसाळ्यात तर वैनगंगगेला पूर आला की लहान पुलावरून पाणी वाहू लागते. या पुलाची कालमर्यादा संपली असून या संदर्तोभात ब्रिटिश शासनाकडून म्हणजेच वर्तमान इंग्लंड सरकारकडून भारत सरकारला पत्र पाठविण्यात आले होते. हा वाहतुकीस योग्य नाही. मात्र त्यानंतरही कारधा गावकडे जाण्यासाठी जवळचा पूल म्हणून आजही शेकडो नागरिक लहान पुलाचाच उपयोग करतात. दुचाकी, रिक्षा आदी वाहने येथून भरधाव जातात. यावर्षी पावसाळ्यात दोनदा या पुलावरून पुराचे पाणी वाहून गेले. सुरक्षा कठडेही तुटले होते. पुलावर मोठे खड्डेही पडले आहेत. अशा स्थितीत जीवघेणा प्रवास सुरू आहे.[१]
हे सुद्धा पहा
बाह्य दुवे
संदर्भ
- ^ "भंडारा : पुलावरून वाहतूक करताय...जरा सांभाळून". eSakal - Marathi Newspaper. 2023-01-10 रोजी पाहिले.