Jump to content

कायो जिल्हा

कायो जिल्हा बेलीझ देशातील सहापैकी एक जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केन्द्र सान इग्नासियो येथे आहे. देशाची नवीन राजधानी बेल्मोपान या प्रांतात आहे.

हा जिल्हा शेतीप्रधान असून येथे नारंगी, ग्रेपफ्रूट आणि टॅंजेरिनच्या मोठ्या बागा आहेत. येथील स्पॅनिश लूकआउट गावाजवळ खनिज तेल सापडले आहे.

बेलीझच्या प्रतिनिधीगृहातील ३१ पैकी सहा मतदारसंघ या जिल्ह्यात आहेत.