Jump to content

कायाहोगा फॉल्स (ओहायो)

कायोहोगा फॉल्स अमेरिकेच्या ओहायो राज्यातील छोटे शहर आहे. २०१० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ४९,६५२ होती. समिट काउंटीमधील हे शहर एक्रन शहराचे उपनगर समजले जाते. या शहराची स्थापना १८१२ साली मॅंचेस्टर नावाने झाली होती. १८३६मध्ये शहराची कायाहोगा फॉल्स नावाने अधिकृत पुनर्स्थापना करण्यात आली.

कायाहोगा नदीकाठी वसलेल्या या शहराजवळ छोटे धबधबे आहेत.