कायपरचा पट्टा
कायपरचा पट्टा किंवा एजवर्थ-कायपर पट्टा हा नेपच्यूनच्या कक्षेपासून पुढे (सूर्यापासून सुमारे ३० खगोलशास्त्रीय एकक (A.U.)) ते ५० खगोलशास्त्रीय एकक यामध्ये पसरला आहे. हा पट्टा लघुग्रहांच्या पट्ट्यासारखाच आहे, मात्र त्यापेक्षा बराच मोठा, म्हणजे जवळपास २० पट रुंद व २०-२०० पट अधिक वस्तुमान असलेला असा आहे.[१][२] लघुग्रहांच्या पट्ट्याप्रमाणेच हा पट्ट्यातसुद्धा मुख्यत्वेकरून सूर्यमालेतील छोट्या वस्तू आहेत. जवळपास सर्व लघुग्रह हे पाषाण रूपात असले तरी कायपर पट्ट्यातील जवळपास सर्व वस्तू ह्या गोठलेला मिथेन, अमोनिया व पाण्याचा बर्फ ह्यांच्या बनलेल्या आहेत. प्लूटो, हौमिआ व माकीमाकी हे तीन बटु ग्रह या पट्ट्यात आहेत. सूर्यमालेतील काही ग्रहांचे उपग्रह (उ.दा. नेपच्यूनचा ट्रायटन व शनीचा फीबी) हे याच पट्ट्यात बनले आणि नंतर त्या ग्रहांच्या गुरुत्वाकर्षणामुळे या पट्ट्यात अडकले आहेत.[३][४]
१९९२च्या सुरुवातीपासून खगोलशास्त्रज्ञांना नेपच्यूनच्या पुढे अनेक छोट्या बर्फाळ वस्तू सापडू लागल्या. यांची केवळ कक्षाच नव्हे तर आकार व संरचना पण प्लूटोसारखी होती. या पट्ट्याला जेरार्ड कायपर यांच्या नावावरून कायपरचा पट्टा असे नाव देण्यात आले. कायपर हे नेपच्यूनपलीकडील वस्तूंच्या गुणधर्माबद्दल भाकीत करण्याच्या पहिल्या काही खगोलशास्त्रज्ञांपैकी एक होते. हा पट्टा अनेक (short-period)(अल्पायुषी)[मराठी शब्द सुचवा] धूमकेतूंचे उगमस्थान मानला जातो. खगोलशास्त्रज्ञ आता प्लूटोला कायपरच्या पट्ट्यातील सर्वात मोठी वस्तू म्हणून गणतात.[५] कायपरच्या पट्ट्यातील वस्तूंमध्ये व धूमकेतूंमध्ये अनेक समानता आहेत. उदाहरणार्थ, सौरवाऱ्यामुळे धूमकेतूंप्रमाणे प्लूटोचाही पृष्ठभाग अंतराळात भिरकावला जात आहे.[६] जर प्लूटोला सूर्यापासून पृथ्वीइतक्या अंतरावर ठेवले तर त्याचीसुद्धा शेपटी तयार होईल.[७]
जरी प्लूटोला कायपरच्या पट्ट्यातील सर्वात मोठी वस्तू मानण्यात येत असले तरी, प्लूटोपेक्षा थोडा मोठा असलेल्या ट्रायटनचे वातावरण, तसेच त्यावरची भूरचना, यांबाबतीतील अनेक गुणधर्म प्लूटोसारखेच आहेत. यामुळे अनेक शास्त्रज्ञांची अशी समजूत आहे की ट्रायटन आधी कायपरच्या पट्ट्यात होता व नंतर तो नेपच्यूनच्या गुरुत्वाकर्षणामुळे त्याच्या भोवतीच्या कक्षेत अडकला.[८]
संदर्भ
- ^ Audrey Delsanti and David Jewitt. "The Solar System Beyond The Planets ( द सोलर सिस्टीम बियॉन्ड द प्लॅनेट्स)" (PDF). 2007-09-25 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). मार्च ९, २००७ रोजी पाहिले.
- ^ Krasinsky, G. A. (2002). "Hidden Mass in the Asteroid Belt (हिडन मास इन द ॲस्ट्रॉईड बेल्ट)". Icarus. 158 (1): 98–105. Bibcode:2002Icar..158...98K. doi:10.1006/icar.2002.6837. Unknown parameter
|month=
ignored (सहाय्य); Unknown parameter|coauthors=
ignored (|author=
suggested) (सहाय्य) - ^ Johnson, Torrence V.; and Lunine, Jonathan I.; Saturn's moon Phoebe as a captured body from the outer Solar System, Nature, Vol. 435, pp. 69–71
- ^ Craig B. Agnor & Douglas P. Hamilton. "Neptune's capture of its moon Triton in a binary-planet gravitational encounter" (PDF). 2007-06-21 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. जून २०, २००६ रोजी पाहिले.
- ^ जरी एरिस हा प्लूटोपेक्षा मोठा आहे तरी तो विखुरलेल्या चकतीमध्ये धरला जातो. हा भाग विकिसंकेतानुसार कायपर पट्ट्यापेक्षा वेगळा आहे. म्हणून प्लूटो कायपरच्या पट्ट्यातील सर्वात मोठी खगोलीय वस्तू बनतो.
- ^ "Colossal Cousin to a Comet?". New Horizons. 2008-05-16 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2006-06-23 रोजी पाहिले.
- ^ Neil deGrasse Tyson. "Space Topics: Pluto Top Ten: Pluto Is Not a Planet". The Planetary Society. 2012-02-05 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2006-06-23 रोजी पाहिले.
- ^ "Neptune's Moon Triton". The Planetary Society. 2006-09-03 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2007-03-26 रोजी पाहिले.