कामदेव
कामदेव | |
कामदेव कामची देवता - इत्यादींची अधिपती देवता | |
मराठी | कामदेव |
कन्नड | ಕಾಮದೇವ |
तमिळ | காம தேவன் |
निवासस्थान | वैकुंठ (अंतरिक्ष) |
लोक | कामलोक |
वाहन | पोपट |
शस्त्र | उसाचे धनुष्य व पुष्प बाण |
वडील | विष्णू किंवा ब्रह्मदेव |
आई | लक्ष्मी |
पत्नी | रति |
अपत्ये | हर्ष व यश |
अन्य नावे/ नामांतरे | रागवृंत, अनंग, कंदर्प, मनमथ, मनसिजा, मदन, रतिदेव, रतिकांत, पुष्पवान, पुष्पधंव |
या अवताराची मुख्य देवता | प्रद्युमन् |
मंत्र | काम गायत्री |
नामोल्लेख | श्रीमद भागवत, विष्णू पुराण हरिवंश महाभारत |
तीर्थक्षेत्रे | वैकुंठ (अंतरिक्ष) |
कामदेव (Sanskrit: कामदेवIAST: Kāmadeva इंग्रजी : Kamadeva Deity hindu gods of love) हा हिंदू धर्मातील 'प्रेम व कामाची' हिंदू देवता आहे.
कामदेवाची पत्नी रति आहे. हरिवंश पुराण महाभारतानुसार कामदेव आणि रति यांना हर्ष व यश अशी दोन मुले आहेत.[१]भागवत पुराणानुसार,कामदेव हा श्रीविष्णू आणि देवी लक्ष्मी यांचा मुलगा आहे.[२]श्रीकृष्ण व रुक्मिणी यांचा पुत्र प्रद्युम्नचा अवतार आहे.[३][४];वैष्णव सिद्धांतानुसार कामदेवाचे श्रीकृष्णाचे आध्यात्मिक रूप मानतात. हिंदू शास्त्रात कामाची देवता मानली जाते. कामदेवाचा जन्म माघ शुद्ध पंचमी म्हणजेच वसंत पंचमीला नळगीर येथे झाला असे मानले जाते. कामदेवाचे स्वरूप तरुण आणि आकर्षक आहे. कामदेव हे एवढे शक्तिशाली आहेत की त्यांना कुठल्याही प्रकारच्या संरक्षण कवचाची कल्पना केली गेली नाही. त्यांचे अन्य नावे रागवृंत, अनंग, कंदर्प, मन्मथ, मनसिजा, मदन, रतिदेव, रतिकांत, पुष्पवान, पुष्पधंव इत्यादी प्रसिद्ध आहेत.
संदर्भ यादी
- ^ "Rati". Wikipedia (इंग्रजी भाषेत). 2019-07-05.
- ^ "Kamadeva". Wikipedia (इंग्रजी भाषेत). 2019-08-31.
- ^ "प्रद्युम्न". विकिपीडिया (हिंदी भाषेत). 2019-01-13.
- ^ "Pradyumna". Wikipedia (इंग्रजी भाषेत). 2019-09-15.