कामठी विधानसभा मतदारसंघ
कामठी विधानसभा मतदारसंघ - ५८ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, कामठी मतदारसंघात नागपूर जिल्ह्यातील १. कामठी तालुका २. मौदा तालुक्यातील खाट आणि मौदा ही महसूल मंडळे आणि ३. नागपूर (ग्रामीण) तालुक्यातील नागपूर हे महसूल मंडळ यांचा समावेश होतो. कामठी हा विधानसभा मतदारसंघ रामटेक लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]
भारतीय जनता पक्षाचे टेकचंद श्रावण सावरकर हे कामठी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]
आमदार
वर्ष | आमदार[४] | पक्ष | |
---|---|---|---|
२०१९ | टेकचंद श्रावण सावरकर | भारतीय जनता पक्ष | |
२०१४ | चंद्रशेखर कृष्णराव बावनकुळे | भारतीय जनता पक्ष | |
२००९ | चंद्रशेखर कृष्णराव बावनकुळे | भारतीय जनता पक्ष |
निवडणूक निकाल
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २००९ | ||
---|---|---|
कामठी | ||
उमेदवार | पक्ष | मत |
चंद्रशेखर बावनकुळे | भाजप | ९५०८० |
सुनीता रमेश गावंडे | काँग्रेस | ६३९८७ |
सुलेखा नारायणराव कुंभारे | बहुजन रिपब्लिकन एकता मंच | २४२३६ |
माणिक नामदेव सूर्यवंशी | बसपा | ४०९८ |
राजू हिंदुस्तानी | अपक्ष | २२८२ |
प्रमोद हरिदास मानवतकर | अपक्ष | १२३९ |
श्रवण नारायण केझरकर | अपक्ष | ७६५ |
बाळाजी संपतराव बावनकुळे | अपक्ष | ३७० |
वंदना विजय आनंद भिमटे | ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक | ३०९ |
हरीश चंदूलाल माधवाणी | रिपाई (खोब्रागडे) | २५४ |
२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुका
विजयी
बाह्य दुवे
- "भारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर कामठी विधानसभा मतदारसंघ निवडणुकांतील इ.स. १९७८ पासूनच्या निवडणुकांचे पक्षनिहाय मतदानाच्या टक्केवारीचे तुलनात्मक विश्लेषण" (इंग्रजी भाषेत). २० जुलै, इ.स. २०१३ रोजी पाहिले.
|ॲक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
संदर्भ
- ^ "Wayback Machine" (PDF). web.archive.org. 2009-02-19. रोजी मूळ पानापासून संग्रहित2009-02-19. 2022-10-28 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
- ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
- ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
- ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".